International Friendship Day 2023 | 30 जुलै की ऑगस्टचा पहिला रविवार, फ्रेंडशीप डे साठी अचूक तारीख कोणती?

International Friendship Day Date 2023 | फ्रेंडशीप डे काही देशांमध्ये 30 ऑगस्टला साजरा केला जातो. तर काही देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी सेलिब्रेट करण्यात येतो. मात्र नेमकी तारीख काय?

International Friendship Day 2023 | 30 जुलै की ऑगस्टचा पहिला रविवार, फ्रेंडशीप डे साठी अचूक तारीख कोणती?
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 3:16 PM

मुंबई | आपल्या प्रत्येकाला नातेवाईक निवडता येत नाहीत. मात्र मित्र-मैत्रिणी निवडता येतात. आपला मित्र/मैत्रीण कोण असावं आणि कोण नसावं हे आपल्याला ठरवता येतं. मित्र-मैत्रिणींशिवाय आपल्या सर्वांचा एकही दिवस जात नाही. प्रत्येकाला कामाच्या गडबडीत दररोज एकमेकांच्या टचमध्ये राहता येत नाही, मात्र फ्रेंडशीप डे मुळे अनेक मित्र-मैत्रीण पुन्हा एकत्र येतात. ज्यांना शक्य ते भेटतात, कुणी भेटून एकमेकांना फ्रेंडशीप बँड बाधून शुभेच्छा देतात. तर कुणी मेसेजे-फोन करुन एकमेकांचा ख्यालीखुशाली विचारतात.

ऑगस्ट महिना उजाडताच सर्वांना वेध लागतात ते या फ्रेंडशीप डे चे. भारतात दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंड शीप डे साजरा केला जातो. भारतात यंदा 6 ऑगस्ट रोजी फ्रेंडशीप साजरा केला जाणार आहे. मात्र काही अनेक देशात 30 जुलैला फ्रेंडशीप डे सेलिब्रेट केला जातो. फेंडशीप डे 2 वेगवेगळ्या दिवशी सेलिब्रेट करण्याचं नक्की गौडबंगाल काय आहे हे आपण जाणून घेऊयात.

ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का?

फ्रेंडशीप डेबाबत अनेक दंतकथा सांगितल्या जातात. त्यानुसार, अमेरिका सरकारने 1935 साली ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी एका व्यक्तीला मारल्याचा म्हटलं जातं. त्या व्यक्तिच्या मृत्यूने मित्र हळहळला. मृत्युचा झटका सहन न झाल्याने मित्रानेही स्वत:ला संपवलं. मैत्रीसाठी जीव देणाऱ्या या उदाहरणामुळे अमेरिका सरकारने ऑगस्टमधील पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही देशांचा अपवाद वगळता संपूर्ण जगभरात फ्रेंडशीप डे साजरा करण्याची पद्धत सुरु झाली.

त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने 2011 साली 30 जुलै ही तारीख फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे जगभरात 30 जुलैला फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. मात्र भारत बांगलादेश,मलेशिया आणि अन्य देशांमध्ये आजही ऑगस्टमधील पहिल्या रविवारीच फ्रेंडशीप डे सेलिब्रेट केला जातो.

जीवाला जीव देणारा, अडचणीत मदतीला धावून येणारा मित्र भेटला तर खऱ्या अर्थाने तुम्ही काहीतरी कमावलं असं म्हटलं जातं.मैत्रीचं महत्तव सांगण्यासाठी, मैत्रीतला ओलावा कायम ठेवण्यासाठी, मैत्रीत एकमेकांसोबत एकत्र घालवलेले क्षण अविस्मरणीय व्हावेत यासाठी, फ्रेंड शीप डे साजरा केला जातो. थोडक्यात काय तर एकमेकांमध्ये असलेले रुसवे फुगवे विसरुन एकत्र येण्याचा खरा उद्देश हा फ्रेंडशीपचा डे सेलिब्रेट करण्यामागचा आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.