Golden Mask | 3000 वर्षांपूर्वीचा गोल्डन मास्क सापडला, डिझाईन ठरतेय चर्चेचा विषय
चीनच्या पुरातत्व विभागालासुद्धा असेच एक गोल्डन मास्क सापडले आहे. तज्ज्ञांच्या मते हे मास्क तब्बल 3000 वर्षे जुने आहे. (china old golden mask found)
बीजिंग : इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अनेक संस्था, विविध देशाचे पुरात्त्व विभाग सातत्याने प्रयत्न करतात. या संस्थांना रोज वेगवेगळ्या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी उत्खननात सापडतात. चीनच्या पुरातत्व विभागालासुद्धा असेच एक गोल्डन मास्क सापडले आहे. तज्ज्ञांच्या मते हे मास्क तब्बल 3000 वर्षे जुने आहे. सॅनशिंगडुई आर्किओलॉजिकल साईटवर उत्खननात हे मास्क सापडले असून या ठिकाणी मास्कसोबतच इतर 500 पेक्षा जास्त पुरातन वस्तू भेटल्या आहेत. या गोल्डन मास्कची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (3000 year old golden mask has been found in China)
गोल्डन मास्क ठरतोय चर्चेचा विषय
चीनमधील सॅनशिंगडुई आर्किओलॉजिकल साईटवर चीनच्या पुरतत्व विभागाला 500 पेक्षा जास्त पुरातन गोष्टी सापडल्या आहेत. अर्धा चेहरा आणि नाकाला झाकाणारे मास्क तसेच वेगवेगळ्या मुर्त्या येथे आढळल्या आहेत. यातच सापडलेले अर्धा चेहरा झाकेल असे गोल्डन मास्क सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या मास्कची तुलना अॅनिमेशनपटातील काल्पनिक नायकांच्या मास्कसोबत केली जात आहे.
Perfect for wallpaper! Best #Sanxingdui cultural relics pics
Sanxingdui: 三星堆 sān xīng duī Wallpaper: 壁纸 bì zhǐ #SanxingduiDiscovery #sanxingduiMuseum #China #Chinese #culture #中国语 #中文 #学中文 #学汉语 #learn #learning #language #learnchinese #Trending #wallpaper pic.twitter.com/1emxsibhfi
— Chinese Master (@ChineseMasterrr) March 23, 2021
आतापर्यंत 50 हजारांपेक्षा जास्त अवशेष आढळले
या साईटवर गोल्डन मास्कसोबतच कांस्य तसेच हत्तीच्या दातापासून सापडलेल्या कलाकृती, सोन्याचे पत्र असं बरंच काही सापडलं आहे. सॅनशिंगडुई आर्किओलॉजिकल साईटवर आतापर्यंत पन्नास हजारापेक्षा जास्त पुरातन वास्तू शोधण्यात आल्या आहेत. इतिहास तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या गोष्टी सापडल्यामुळे प्राचीन काळातली शू राज्याची संस्कृती आणि त्या काळातील लोकांच्या राहणीमानाचा अभ्यास करता येऊ शकतो. चीनमध्ये इ.पू. 316 मध्ये शू राज्यावर शू नावाचा राजा राज्य करत होता. याच प्रांताला आता सिचुआन या नावाने ओळखले जाते. याच ठिकाणी अनेक पुरातन वस्तू सापडल्या आहेत.
#Sanxingdui: #Archaeologists #discover 3,000-year-old #GoldMask in #Sichuan, #China <3 @jzebraa #Art #Metal https://t.co/JpHzu6ftjv pic.twitter.com/GbaaQcLaGQ
— Jzebraa™? ℐ☆⋓ᴚᴆ⍣ϗ∞ɀ∑βяⒶ⋀ ®? (@jzebraa) March 22, 2021
इतर बातम्या :
सचिन तेंडुलकरची BMW X5M विकत घ्यायचीय? नाशिकच्या मालकाकडून विक्रीला, किंमत अवघी…
(3000 year old golden mask has been found in China)