Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shocking video : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 3 सेकंदांत कोसळली 5 मजली इमारत, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Building collapsed : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हादराच (Shock) बसेल. एक इमारत 3 सेकंदात कोसळली आहे. व्हिडिओमध्ये 5 मजली इमारत अवघ्या 3 सेकंदात कोसळल्याचे दिसून येते.

Shocking video : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 3 सेकंदांत कोसळली 5 मजली इमारत, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद
अवघ्या तीन सेकंदांत कोसळली पाचमजली इमारतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 10:42 AM

Building collapsed : संध्याकाळी काम करून कंटाळून माणूस घरी पोहोचतो. कोणत्याही व्यक्तीचे सर्वात प्रिय ठिकाण म्हणजे त्याचे घर. कल्पना करा, जर तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरी पोहोचलात आणि तो तिथे तुमचे घर नसेल, ते जमिनीवर कोसळले असेल तर? आपल्याकडे काहीच उरले नाही, असे तुम्हाला वाटेल. आपण सर्वस्व गमावल्याची भावना होईल. सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हादराच (Shock) बसेल. एक इमारत कोसळली आहे तीही 3 सेकंदांत. हा व्हिडिओ 5 मजली इमारतीशी संबंधित आहे. व्हिडिओमध्ये 5 मजली इमारत अवघ्या 3 सेकंदात कोसळल्याचे दिसून येते. या इमारतीत राहणाऱ्या लोकांचे काय झाले असेल याचा विचार करा. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्तच झाले. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही दु:ख होईल.

हिमाचल प्रदेशमधला व्हिडिओ

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की 5 मजली इमारत प्रथम एका बाजूला कलंडते आणि पाहताच ती कोसळते. या 5 मजली उंच इमारतीच्या कचाट्यात एक छोटेसे घरही येते आणि तेही गाडले गेल्याने उद्ध्वस्त झालेले दिसते. त्याचवेळी इमारत पूर्णपणे कोसळते. हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा असून तो हिमाचल प्रदेशचा आहे. अहवालानुसार, मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे हे घर एका झटक्यात कोसळले. आता हा व्हिडिओ पाहू या…

भूस्खलनामुळे इमारत कोसळली

पावसाळ्याच्या दिवसात उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात अशी दृश्ये पाहायला मिळतात. कधी दरड कोसळून घरांचे नुकसान होते, तर कधी रस्ते तुटतात. हा व्हिडिओ theournaturee नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 35 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

आणखी वाचा :

Inspirational : संकटकाळात मार्ग सापडत नाही? ‘हा’ Video पाहा, आयुष्याच्या वाटेवर नक्कीच ठरेल उपयोगी

कामाविषयी समर्पण हवं ‘असं’; समोर इमारत बॉम्बनं जमीनदोस्त होत होती, ‘तो’ मात्र जागेवरून हलला नाही..!

शिवथाळीची ऐशी-तैशी..! चक्क शौचालयात धुतली जात आहेत भांडी, संतापजनक Video viral

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.