स्कुटीच्या डिकीत सहा किलो गांजा सापडला, हे सगळं पाहून पोलिसांना घाम फुटला, मग…

सहा किलो गांजा असा अमली पदार्थ, एक मोटार गाडी व दोन मोबाईल फोन असा एकूण दोन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. गांजा नेमका आणला कुठून याची पोलिस चौकशी करीत आहेत.

स्कुटीच्या डिकीत सहा किलो गांजा सापडला, हे सगळं पाहून पोलिसांना घाम फुटला, मग...
घरांचा ताबा देण्यास नकार देणाऱ्या बिल्डरविरोधात तक्रारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 8:18 AM

कल्याण : कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या (kalyan police) हद्दीतील बेकायदेशीर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. करीम उर्फ बाबू शब्बीर शेखन आणि सीमाब कईम शेख उर्फ गुड्डू चपाती असे या दोन आरोपीचे नावे असून हे आरोपी बाईकच्या (bike) डिक्कीत गांजा बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची तस्करी करत होते. सध्या पोलिसांनी या दोन्ही आरोपीकडून सहा किलो गांजा असा अमली पदार्थ. एक बाईक दोन मोबाईल (mobile) फोन असा एकूण 1 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मागच्या काही दिवसांपासून अंमली पदार्थाची बेकायदेशीर रित्या खरेदी विक्री नशेच्या बाजारासाठी लपून-छपून होत असल्याच्या बातम्या दरदिवशी ऐकायला मिळत होत्या. अशातच नशा करून नवीन पिढी खराब होत असताना, नशेच्या वस्तू विकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळणे त्यांच्यावर अंकुश ठेवणे अतीशय गरजेचे आणि चॅलेंजिंग काम झाले होते, अशीच एक चांगली कामगिरी कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशनचे डिटेक्शन पथकाने केली आहे.

हे सुद्धा वाचा

कल्याण पश्चिम परिसरात रेतीबंदरकडे जाणाऱ्या पूलाखाली दोघेजण गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची बातमी बाजारपेठ डिटेक्शन स्टाफ मधील पोलीस हवालदार सचिन साळवी व सुरेश पाटील यांना मिळाली. त्यानुसार कल्याण बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून मोटारसायकलवरुन जाणाऱ्या दोन संशयित इसमाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याच्याकडे सहा किलो अमली पदार्थ मिळून आला असून पोलिसांनी लगेचच त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सहा किलो गांजा असा अमली पदार्थ, एक बाईक व दोन मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत या दोघांनी हा अमली पदार्थ नेमका कुठून आणला याची चौकशी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे एपीआय अरुण घोलप व त्याची टीम करत आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.