VIDEO | एका स्प्लेंडर बाईकवरती 7 मुलं बसली, व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला
VIRAL VIDEO | सध्याचा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. एका स्प्लेंडर बाईकवरती 7 मुलं बसली आहेत. त्या बाईकचा चालक दिसत नाही. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीनं हा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
मुंबई : सोशल मीडिया (social media) ही एक अशी गोष्ट आहे की, जिथं तुम्हाला काहीही पाहायला मिळू शकतं. त्याचबरोबर तुम्हाला इथे कुठलाही जुगाड पाहायला (jugaad video) मिळतो. तर काही लोकं बाईकवरती असा स्टंट करतात की, त्यामुळे लोकांना धक्का बसतो. काही असे व्हिडीओ आहेत की, ते पाहत असताना लोकांचा डोळ्यावर विश्वास राहत नाही. सोशल मीडियावर काहीवेळा अशा गोष्टी पाहायला मिळतात की, त्या लोकांना कमेंट केल्याशिवाय राहावतं नाही. सध्या असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लोकं असाही विचार करीत आहे की, असे स्टंट (stunt video) तरुण का करीत आहेत की ज्यामुळे त्यांना अडचण निर्माण होऊ शकते. तुम्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एका बाईकवरती सात मुलं बसली आहेत. ती बाईक रस्त्याने निघाली आहे.
स्प्लेंडर बाईकवरती 7 मुलं बसली
व्हायरल होत असलेल्या त्या व्हिडीओमध्ये एका स्प्लेंडर बाईकवरती 7 मुलं बसली आहेत. त्यापैकी काही मुलांची एकमेकांला पकडून आधार घेतला आहे. त्याच्यातला एक मुलगा गाडी चालवत आहे. तुम्ही हा व्हिडीओ बारकाईने पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, एका बाईकवरती सात मुलं बसली आहेत. दोन मुलांचा इतर मुलांनी आधार घेतला आहे. त्या मुलांना पाहून असं वाटतं आहे की, ती मुलं एक खतरनाक स्टंट करीत आहेत. ही मुलं ज्यावेळी स्टंट करीत आहेत, त्यावेळी इतर लोकं त्याचा व्हिडीओ शूट करीत आहेत.
View this post on Instagram
व्हिडीओ दोन लाख लोकांनी पाहिला
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवरती दहा दिवसांपूर्वी शेअर केला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामध्ये काही लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. एक व्यक्तीनं लिहीलं आहे की, हे काहीचं नाहीचं नाही. एकजण अर्धवट झोपला आहे. दुसऱ्या एका व्यक्तीनं असं लिहीलं आहे की, थोडासा बॅलेन्स बिघडला तर, काय होऊ हे तुम्हाला माहित आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय, ते तुम्ही आम्हाला कमेंट करुन कळवा.