Video : वयाच्या 70 व्या वर्षी आजीबाईंच्या दोरीवरच्या उड्या, नेटकरी म्हणतात, “फिटनेस असावा तर असा!”

Viral Video : सोशल मीडियावर अनेक गोष्टी ट्रेंडिंग असतात. ज्यात काही फनी असतात. तर काही आपल्याला प्रेरणा देऊन जातात. असाच एक प्रेरणादायक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : वयाच्या 70 व्या वर्षी आजीबाईंच्या दोरीवरच्या उड्या, नेटकरी म्हणतात, फिटनेस असावा तर असा!
वयाच्या 70 व्या वर्षी आजी बाईच्या दोरीवरच्या उड्या
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 11:17 AM

मुंबई : धावपळीच्या जगात आपल्या फिटनेसकडे (Fitness) लक्ष देणं गरजेचं असतं. त्यातही वाढत्या वयामुळे शरिरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. अश्या परिस्थितीत तर शरिराला जपणं त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. पण काही लोक आपल्या शारिरिक तंदुरुस्तीकडे खास लक्ष देत असतात. त्यामुळे वयाची सत्तर वर्षे पूर्ण करूनही ही मंडळी फिट दिसतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांची प्रेरणा बनत आहे. यात सत्तरहून जास्त वयाच्या महिला (Women) दोरीवरच्या उड्या मारताना दिसत आहेत. हा व्हीडिओ पाहून फिटनेस असावा तर असा, अशीच प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा (Viral Video) आहे.

व्हायरल व्हीडिओ

सोशल मीडियावर अनेक गोष्टी ट्रेंडिंग असतात. ज्यात काही फनी असतात. तर काही आपल्याला प्रेरणा देऊन जातात. असाच एक प्रेरणादायक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत दोन महिला दोरीची दोन टोकं पकडून उभी आहेत. दोन महिला त्यांच्या बाजून उभ्या आहेत. यातली एक महिला पुढे येते दोरीला पकडून उभ्या असणाऱ्या या महिला दोरी फिरवायला लागतात. अन् ही चिरतरूण महिला उड्या मारायला लागते. तर दुसरी महिलाही त्यानंतर पुढे येते. तीही दोरीवरच्या उड्या मारायला लागते. हा व्हीडिओ सध्या अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे.

हा व्हीडिओ गुड न्यूज मुव्हमेंट या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला “विकेंड असा उड्या मारण्यात जावा… दोरीवर उडी मारणाऱ्या या गोड वृद्ध महिलांइतकाच आनंद तुम्हाला मिळो… या व्हीडिओमुळे मी प्रभावित झालो आहे”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

यावर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “आज सकाळी मी हा व्हीडिओ पाहिला आणि माझ्या अंगात उर्मी निर्माण झाली. “मलाही आता व्यायाम करण्याचा उत्साह आला आहे”, असं एक नेटकरी म्हणाला आहे. तर “हा व्हीडिओ आम्हा तरूणांना लाजवणारा आहे. आम्ही आता यातून प्रेरणा घेत फिटनेसकडे लक्ष देणार आहे”, असं एक नेटकरी म्हणाला आहे.

हा व्हीडिओ तरूणांना आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावणारा आहे. या व्हीडिओतून तुम्हीही प्रेरणा घ्या अन् आपला फिटनेस राखा…

संबंधित बातम्या

Video : पक्ष्यांना ‘याड लागलं’, डोळ्याचं पारणं फेडणारा व्हीडिओ, एकदा बघाच…

Video : पोलिसाने वाचवले माकडाचे प्राण, स्थानिकांकडून कौतुक, व्हीडिओ व्हायरल…

VIDEO: जगात अशक्य असं काहीच नाही! या दिव्यांग व्यक्तीचा व्हिडीओ पाहा, त्याच्या जिद्दीला कराल सलाम

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.