97 वर्षांच्या आजीच्या धाडसाला सलाम, आनंद महिंद्र यांनी देखील केले कौतूक, पाहा काय केली कामगिरी
उद्योगपती आनंद महिंद्र सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. ते बिनधास्त आपली मते मांडत असतात. अनेकदा समाजातील व्यंगावर आपले बोट ठेवतात. तर अनेकादा प्रेरणादायी व्हिडीओ देखील शेअर करीत असतात. आपल्या कंपनीच्या गाड्यांचे देखील ते प्रमाेशन करीत असतात.
मुंबई | 23 नोव्हेंबर 2023 : असं म्हटलं जातं की शिकण्याचं कोणतंही वय नसतं. कोणत्याही वयात माणूस काहीही शिकू शकतो. त्यासाठी वयाचं काही बंधन नसतं. आपल्याकडे केवळ जिद्द असायला हवी. जर तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही कोणतेही धाडस करू शकता. याच गोष्टीला एका 97 वर्षांच्या आजीबाईंनी खरं करून दाखवलं आहे. या आजीला आकाशात पक्षाप्रमाणे उडायचे होते. मग आजींनी बिनधास्तपणे पॅराग्लायडींग करुन दाखविले. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून उद्योगपती आनंद महिंद्र यांनी देखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर ( आधी ट्वीटर ) अब्जाधीश उद्योगपती आनंद महिंद्र यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी लिहीले आहे की उड्डाण घेण्यास कोणतंही वयाचं बंधन किंवा उशीर नसतो. तुम्ही कोणत्याही वयात उड्डाण घेऊन शकतो. आज या माझ्या हिरो आहेत. आता आपण पाहूयात या व्हिडीओत असे काय खास आहे की आनंद महिंद्र इतके प्रभावित झाले.व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक आजीबाई काही लोकांच्या आधाराने मोटर संचलित पॅराग्लायडरच्या आत बसतात. त्यानंतर त्यांनी गॉगल आणि हॅल्मेट घातले जाते. त्यांना बेल्टने व्यवस्थित बांधले जाते. त्यानंतर मोटर चालू करून हे पॅराग्लायडर आजीला घेऊन हवेत उडते. व्हिडीओला सोशल मिडीयावर खूप पाहीले जात आहे.
येथे पहा व्हीडीओ –
It’s NEVER too late to fly. She’s my hero of the day… pic.twitter.com/qjskoIaUt3
— anand mahindra (@anandmahindra) November 23, 2023
लोकांच्या प्रतिक्रीया काय ?
सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून एका युजरने म्हटले की मला खूप आनंद वाटला हा व्हिडीओ पाहून. दुसऱ्या एका युजरने म्हटले की आजींना हृदयापासून सलाम ! बातमी लिहीली जाईपर्यंत या व्हिडीओला 3 लाखांहून अधिक इंटरनेट धारकांनी पाहिले आहे.