VIDEO | हॉस्पिटलमध्ये 102 वर्षांच्या नवऱ्याने पत्नीला दिले सरप्राईज, पतीला पाहून पत्नी झाली भावूक
VIRAL VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे, त्यामध्ये एक वयोवृध्द आजी आजारी आहे, तिला पाहण्यासाठी 102 वर्षाचे पती पोहचले आहेत. पतीला पाहिल्यानंतर पत्नीने काय केले पाहा व्हिडीओत.
मुंबई : आयुष्यात प्रत्येकाला एक जोडीदार हवा असतो. त्याचबरोबर तो आयुष्यभर प्रेम करेल असा हवा असतो. प्रेमात एकमेकांना गिफ्ट देणं ही गोष्ट नॉर्मल आहे. वयोवृध्द झाल्यानंतर सुध्दा काही जोडपी एकमेकांना किती जपत असतात हे अनेकदा सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झालेल्या व्हिडीओतून पाहायला मिळालं आहे. सध्या सोशल मीडियावर एक वयोवृध्द पती आणि पत्नीचा व्हिडीओ व्हायरल झाला (viral video) आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका (Good News Movement) आवडला आहे की, त्या व्हिडीओ सतत कमेंट येत आहेत.
आजारी पत्नीला बुके दिला आणि किसं केलं
ट्विटरवरती एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये 102 चा एक व्यक्ती आपल्या आजारी पत्नीला अचानक भेटायला आला आहे. त्या व्यक्तीच्या हातात एक बुके आहे. ज्यावेळी पत्नी आपल्या पतीला पाहते, त्यावेळी ती प्रचंड खूष होते. पती हातातील बुके पत्नीच्या हातात देतो आणि किस करतो. पती इतका वयोवृध्द आहेत की वाकून हळूहळू चालत आहे. त्याचबरोबर वयोवृध्द व्यक्तीला कोणीतरी पकडून आणलं आहे. या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे.
102-year-old husband brings flowers to the love of his life who is in the hospital. ????? pic.twitter.com/fTx4DSeXLy
— GoodNewsMovement (@GoodNewsMVT) May 4, 2023
‘कोणीतरी माझ्यावर असे प्रेम केले असते’
व्हायरल केलेल्या व्हिडीओ कॅप्शन दिलं आहे, “102 वर्षीय पती त्याच्या आयुष्याच्या प्रेमासाठी फुले घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला”. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. गुरुवारी हा व्हिड़ीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ ट्विटरवरती 18 हजार लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे, त्यामुळे लोकं त्या व्हिडीओला रिट्वीट करीत आहेत. कुणीतरी लिहिलं आहे की- ‘जिवंत आहे, पर्यंत प्रेम करू’, एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, ‘कोणीतरी आपल्यावर असे प्रेम करावे अशी माझी इच्छा आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी अधिक भावूक झाले आहेत.