बॉयफ्रेंडसोबत रेस्टॉरंटमध्ये खाल्ली मिठाई, अन् तरूणीच्या थेट प्राणावरच बेतले, काय होते मिठाईत असे ?
एखाद्या मिठाईचा एक घास एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो का ? असे प्रकरण घडले आहे. एका तरुणीला तिच्या बॉयफ्रेंड सोबत रेस्टॉरंटमध्ये ही मिठाई खाणे जीवावर बेतणारे ठरले आहे. असे काय होते या मिठाईमध्ये की एक घास खाताच 20 वर्षीय तरुणीला आपले प्राण गमवावे लागले. चला पाहुयात काय नेमके घडले ते...
मिलान | 18 जानेवारी 2024 : एखाद्या मिठाईमुळे कोणाच्या प्राणावरच बेतू शकते…अशीच एक विचित्र घटना घडली. एक तरुणी आपल्या बॉयफ्रेंड सोबत डेटवर गेली होती. या रेस्टॉरंटमध्ये आपल्या बॉयफ्रेंड सोबत तिची ती शेवटची डेट ठरली. या तरुणीने खूप विचारांती एक डेझर्ट ऑर्डर केले. त्यावेळी तिला जराही कल्पना नव्हती की याचा स्वाद घेतल्यानंतर ती या जगात नसणार…. ही मिठाई खाताच तिला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. तिची तब्येत बिघडली आणि काही दिवसात तिचे प्राण गेले, अखेर काय असे घडले की एका मिठाईमुळे तरुणीला प्राण गमवावे लागले.
20 वर्षांची एना बेलिसारियो ही इटलीचे शहर मिलान येथे पेशाने फॅशन डिझायनर आहेत. तिने ऑर्डर केलेल्या मिठाईतील सामुग्री तिचे प्राण घेण्यास कारणीभूत ठरली. वास्तविक एनाला डेअरी प्रोडक्ट्सची गंभीर स्वरुपाची एलर्जी आहे. त्यामुळे ती वेगन पदार्थच खायची. एना आपल्या बॉयफ्रेंड सोबत ज्या रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तेथे डेझर्ट वेगन सांगून सर्व्ह केला गेला. परंतू जसा तिने त्या मिठाईचा तुकडा तोंडात टाकला तसा तिची तब्येत बिघडली. आधी तिला श्वास घेता येईना. नंतर तिला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तिचा दहा दिवसांनी मृत्यू झाला.
डेली स्टारच्या मते एना हीने एक खास प्रकारची मिठाई ‘तिरामिसू’ खाल्ली होती. परंतू दोन बाईट घेताच तिला एलर्जी झाली. आणि तिची तब्येत खराब झाली. त्यानंतर जे घडले ते तुम्हाला माहीतीच आहे. ही घटना गेल्यावर्षी 26 जानेवारी रोजी घडलेली आहे. मृत तरुणीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण कोर्टात गेले. आता या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.
रेस्टॉरंटवर आरोप काय ?
एका नॉर्मल डीशला त्यांनी व्हेगन सांगून सर्व्ह केल्याचा आरोप या रेस्टॉरंटवर ठेवण्यात आला आहे. व्हेगनमध्ये दूध, दही, तूप, बटर, ताक, मलई आणि पनीर असे कोणतेही डेअर प्रोडक्ट नसतात. तरुणी डेअरी प्रोडक्ट्सची तीव्र एलर्जी असून हा पदार्थ व्हेगन म्हणून सर्व्ह केला. त्यामुळे एनाची तब्येत ढासळून तिचा मृत्यू झाला. तपासात तिरामिसू डीशमध्ये केवळ दूधच नव्हे तर अंड्यांचाही वापर केला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी जे सॅंडविच खाल्ले होते त्याच्या मोयनीजमध्ये अंड्यांचा अंश आढळले. एना हीच्या केसनंतर इटलीच्या आरोग्य मंत्रालयाने या मिठाईला बाजार अन्य 63 रेस्टॉरंटच्या मेन्यूमधून हटविली आहे. सध्या तिरामिसू नावाच्या पेस्ट्रीचे दुकान चालविणाऱ्या मायलेकींवर या प्रकरणात तरुणीच्या मृत्यू प्रकरणी केस सुरु आहे. न्यायाधीशांनी या प्रकरणाला बेईमानीची चिंताजनक स्थिती असे म्हटले आहे.