सौदीत होत आहे तब्बल 400 मीटर उंच इमारत, त्यात असतील 104,000 फ्लॅट्स
सौदी अरब बांधत असलेली इमारत क्युबच्या आकाराची असेल, ही इमारत न्यू यॉर्कच्या एम्पायर स्टेट इमारतीच्या 20 पट मोठी असेल
नवी दिल्ली : सौदी अरबने आपला खास ड्रीम प्रोजेक्ट सुरू केला असून त्या अंतर्गत राजधानी रियाध येथे अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील एम्पायर स्टेट सारख्या 20 इमारती सामावतील इतकी भव्य इमारत बांधण्यास सुरूवात केली आहे. या प्रकल्पाला ‘मुकाब’ असे नाव देण्यात आले आहे. भविष्याचा प्रकल्प म्हणून या ड्रीम प्रोजेक्टला नाव देण्यात आले आहे. या प्रोजेक्टला तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून तयार केले जात आहे.
सौदी अरब बांधत असलेली इमारत क्युबच्या आकाराची असेल, ही इमारत न्यू यॉर्कच्या एम्पायर स्टेट इमारतीच्या 20 पट मोठी असेल, या इमारतीत अनेक सुविधा असणार आहेत. त्यात एक म्युझियम आणि थिएटरही असणार आहे. 80 अशा जागा असतील जेथे सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रम घेता येतील. या इमारतीत एकूण 104,000 फ्लैट्स असतील, 9 हजार हॉटेलचे सुट्स असतील. कार्यालयांसाठी जागा असेल. तसेच अनेक सामुदायिक केंद्रे असतील.
नैसर्गिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न
सौदी अरबने या प्रकल्पासाठी त्यांच्या सर्व खजिना खुला केला आहे. या प्रकल्पा हिरवाईसाठी खास काळजी घेण्यात येईल. लोकांच्या आरोग्याचा विचार करून नैसर्गिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असणार आहे. येथे लोक आरामात सायकिलींग आणि मॉर्निंग वॉक करू शकतील तसेच त्यांच्या दैनंदिन कामासाठी या इमारतीचा वापर करता येईल. या इमारतीत वीजेसाठी सूर्यप्रकाश आणि वाऱ्याचा वापर करण्यात येईल असे अरब न्यूजमध्ये म्हटले आहे.
ही इमारत 400 मीटर उंच असणार
ही इमारत 400 मीटर उंच आणि 400 मीटर लांब आणि 400 मीटररूंद असणार आहे. तिचा आकार क्यूब सारखा असेल. या इमारतीची निर्मिती भविष्याची इमारत म्हणून केली जाईल. राजधानी रियाधचा विकास आणि 2030 पर्यंत येथील लोकसंख्या दुप्पट होईल असे गृहीत धरून इमारतीचा विकास केला जात आहे. सौदीचे प्रिन्स मोम्ममद बिन यांच्या संकल्पनेतून इमारत बांधली जात आहे. या इमारतीसाठी चारशे अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जात आहे.
भारतासाठी वैशिष्ट्यपूर्ण शहर
हे शहर भारतासाठी वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, या मेगाप्रोजेक्टमुळे 3.34 लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. सध्या 25 लाख भारतीय या देशात राहतात. या देशात सर्वाधिक कौशल्य असलेले नागरिक राहतात. जे अशाप्रकाराच्या कामासाठी अशाच कुशल कामगारांची गरज आहे.