VIRAL NEWS : लाखोंचे बिल न भरताच वधू-वर पळून गेले
VIRAL NEWS : हॉटेलच्या एका मालकाने आरोप केला आहे की, एका जोडप्याने रिप्सेप्शनचं बिल न भरताचं तिथून पळ काढला आहे. त्यामुळे मालकाची अवस्था अत्यंत वाईट आहे.
मुंबई : प्रत्येक जोडप्याचं (COUPLE NEWS) एक स्वप्न असतं की, आपलं लग्न आणि रिसेप्शन एकदम शानदार पद्धतीने व्हावे. कारण त्यांच्या लग्नाला जेवढी माणसं आलेली आहेत, त्यांनी त्यांचं कौतुक करायला हवं. तुमच्या लग्नाचा हॉल जितका चांगला असेल, तितका जास्त त्याचा खर्च देखील असेल. खर्च कितीही असला तरी त्याचे पुर्ण पैसे द्यायला हवेत. सध्या इटली (ITALY) देशात एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. तिथं एका हॉलमध्ये आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना पार्टी (GRAND PARTY) दिल्यानंतर तिथून जोडपं फरार झालं आहे.
हॉलच्या मालकांनी आरोप केला आहे की, जोडपं तिथलं बिल न भरता फरार झालं आहे. त्यांनी ही सुध्दा गोष्ट सांगितली आहे की, त्यांचं त्यामुळं खूप मोठं नुकसान झालं आहे. 40 वर्षाच्या मोरेनो प्रायरेटी आणि पत्नी आंड्रे स्वेन्जा यांनी फ्रोसिनोन येथील रोटोंडा सीफूड हॉटेलमध्ये नातेवाईकांना पार्टी दिली आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांनी काही गोष्टीचं बिल भरलं आहे. आठ लाख रुपये बिल झालं होतं. ते बिल त्या जोडप्याने पुर्ण केलं नाही.
बिल न देताचं पळालं जोडपं
मालकांनी सांगितलं की, बिल न भागवताचं जोडपं पळालं. त्यांनी त्या जोडप्याकडून सुरुवातीला काही रक्कम घेतली होती. परंतु ही रक्कम त्यांनी पार्टी सुरु होण्याच्या काही मिनिटे आगोदर भरली होती. त्यांचं बिल अधिक झालं होतं. सगळ्या नातेवाईकांनी दारु पिली, भरपूर जेवले, ज्यावेळी ते बिल घेण्यासाठी तिथं पोहोचले. त्यावेळी तिथं त्यांना जोडपं भेटलं नाही. तिथले नातेवाईक सुध्दा काहीवेळाने फरार झाले.
ही घटना घडल्यानंतर जर्मन आणि इटली पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी एक अभियान चालवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिथल्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की, त्यांनी सगळं पेमेंट दिलं आहे. मालकापर्यंत सगळे पैसे पोहोचलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. जोपर्यंत मालकाला पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत ही केस अशीचं सुरु राहणार आहे.