Viral video : …अन् समुद्रात कोसळलं Helicopter! पाहा, Miami beachवरचा ‘हा’ थरार
Helicopter crash : अमेरिकेतील (America) फ्लोरिडा (Florida) येथील मियामी (Miami) बीचजवळ हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणापासून काही अंतरावर शेकडो लोक समुद्रकिनाऱ्यावर पोहत आणि पार्टी करत होते.
Helicopter crash : अमेरिकेतील (America) फ्लोरिडा (Florida) येथील मियामी (Miami) बीचजवळ हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणापासून काही अंतरावर शेकडो लोक समुद्रकिनाऱ्यावर पोहत आणि पार्टी करत होते. या अपघातात दोन जण जखमी झाले, मात्र एका पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 20 फेब्रुवारीची ही घटना आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.20 वाजता घडली. हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. यापैकी दोन जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ बंद करून तपास सुरू केला. दुसरीकडे, फेडरल एव्हिएशन अथॉरिटीही या अपघाताची आपल्या स्तरावर चौकशी करण्याची तयारी करत आहे. घटना घडल्यानंतर याचा थरारक व्हिडिओ व्हायरल झालाय. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडिओ आहे.
हेलिकॉप्टर आकाशातून समुद्रात पडले
मियामी बीच पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. संपूर्ण समुद्रकिनारा माणसांनी खचाखच भरल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर आकाशातून एक हेलिकॉप्टर समुद्रात पडते. तिथे उपस्थित लोक इकडे तिकडे पळू लागले.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही लोक खूप शेअर करत आहेत. व्हिडिओ शेअर करताना एका यूझरने लिहिले, की हे भयानक आहे.
बचाव पथकाने लोकांना बाहेर काढले
घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने धाव घेऊन लोकांना बाहेर काढले. अपघाताचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासानंतरच यामागचे कारण समोर येईल. हेलिकॉप्टर मधोमध क्रॅश झाले असते तर मोठी हानी आणि जीवितहानी झाली असती.
This afternoon at 1:10 p.m., MBPD received a call of a helicopter crash in the ocean near 10 Street. Police and @MiamiBeachFire responded to the scene along with several partner agencies. Two occupants have been transported to Jackson Memorial Hospital in stable condition.
1/2 pic.twitter.com/heSIqnQtle
— Miami Beach Police (@MiamiBeachPD) February 19, 2022