VIDEO | एका व्यक्तीने कुत्र्याला डिजेच्या तालावर नाचवलं, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी…
VIRAL VIDEO | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे, त्यामध्ये एक व्यक्ती कुत्र्याला खांद्यावर घेऊन नाचत आहे. त्या व्यक्तीचा आतरंगी डान्स पाहून अनेकांना हसू आवरत नाही अशी स्थिती आहे.
मुंबई : सध्या लग्नाचा सीजन असल्यामुळे लोकांचे डान्स करीत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Dance Viral Video) पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये विचित्र डान्स सु्द्धा आहेत, असे व्हिडीओ लोकांना अधिक आवडतात असं पाहायला मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये लोकं अधिक हसत असल्याचे पाहायला मिळत आहे. एक व्यक्ती डीजेच्या (DJ) तालावर आपला कुत्रा (DOG) घेऊन डान्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नात डान्स केलेले अनेक व्हिडीओ यापुर्वी सुध्दा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लोकांना एखाद्या व्यक्तीचा डान्स आवडल्यानंतर तो व्हिडीओ अधिक व्हायरल होतो.
डीजेच्या तालावर सगळी एक सारखे डान्स करीत…
व्हिडीओला पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, हा एका लग्नाचा कार्यक्रम आहे. तिथं डीजेच्या तालावर सगळी एक सारखे डान्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्या लोकांच्या गर्दीत एक व्यक्ती अनोख्या पद्धतीने डान्स करीत आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने हातात कुत्रा घेतला आहे. कुत्र्याला एखाद्या लहान मुलासारखं पकडलं आहे. लोकांनी हा डान्स पाहिल्यापासून त्यांना हसू आवरत नसल्याचं ते सांगत आहेत.
View this post on Instagram
1 लाख 29 हजार लोकांनी लाईक केले
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे. इंन्स्टाग्रामवरती हा व्हिडीओ sunil.in1 नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. हे सगळं पाहून नेटकरी सुध्दा संतापले आहेत. हा व्हिडीओ मार्च महिन्यात सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्याचबरोबर या व्हिडीओला 1 लाख 29 हजार लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिलेले सगळे वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.