17 वर्षांपासून जेवण केलं नाही, फक्त कोल्डिंग्स पिऊन जगतोय, हैराण करणारा दावा

| Updated on: May 15, 2023 | 4:29 PM

संपूर्ण दिवस फक्त पेप्सी किंवा सेव्हन युपी पिऊन जगतात. कोल्डिंग्स पिऊन तो फक्त जिवंतच नाही. तर पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

17 वर्षांपासून जेवण केलं नाही, फक्त कोल्डिंग्स पिऊन जगतोय, हैराण करणारा दावा
फोटो - डेली स्टार
Follow us on

नवी दिल्ली : एका व्यक्तीने हैराण करणारा दावा केलाय. तो म्हणतो की मला भूक लागत नाही. १७ वर्षांपासून तो फक्त कोल्डिंग्स पितो. त्याने २००६ ला अन्न खाणं बंद केलं. यवढं नाही तर तो म्हणतो मी फक्त चार तास झोप घेतो. त्याच्या या दावामुळे लोकं वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करत आहेत. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीचं नाव घोलमरेजा अर्देशिरी असं आहे. अर्देशिरी यांनी असा दावा केला की, गेल्या १७ वर्षांपासून त्याच्या तोंडात अन्नाचा कण नाही. ते संपूर्ण दिवस फक्त पेप्सी किंवा सेव्हन युपी पिऊन जगतात. कोल्डिंग्स पिऊन तो फक्त जिवंतच नाही. तर पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

जेवणाचा प्रयत्न केल्यास उलटी

अर्देशिरी फायबर ग्लास रिपेअरींगचे काम करतात. त्याचं पोट फक्त कोल्डिंग्स पचवू शकते. जेवणाचा प्रयत्न केला तर त्याला उलटी होते. अर्देशिरी याने शेवटी २००६ मध्ये जेवण केलं होतं. त्यानंतर तो फक्त कोल्डिंग्रस पिऊन जगत आहे. अर्देशिरीनुसार, पेप्सी आणि सेव्हन अपसारखे कार्बोनेटेड ड्रींक्समधून मिळणारी ऊर्जा त्याला जगण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी पुरेसी आहे.

हे सुद्धा वाचा

जेवण केल्यास तोंडात केस गेल्यासारखं वाटतं

अर्देशिरी यांनी हेही सांगितलं की, त्याने या परिस्थितीची डॉक्टरांना जाणूव करून दिली. परंतु, कोणताही आजार झाल्याचं सांगण्यात आलं नाही. जेव्हा तो जेवण करतो तेव्हा त्याला तोंडात केस गेल्यासारखे वाटतात. परंतु, कोल्डिंग्ससोबत अशी कोणतीही समस्या येत नाही.

कोल्डिंक्समुळे वजन आणि शुगर वाढते

डॉक्टरांनी अर्देशिरीला सांगितलं की, मानसिक रुग्णाकडे गेलेलं चागलं राहील. परंतु, अद्याप अर्दिशिरीला भुकेच्या बदलाचे कारण समजू शकले नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वजन वाढवण्यास आणि शुगर वाढवण्यास कोल्डिंग्स मोठी भूमिका बजावतो. त्यामुळे खूप कमी प्रमाणात कोल्डिंग्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, याचा अर्देशिरी यांच्यावर कोणताही परिमाण झालेला नाही.