9 बायका अन् फजिती ऐका!, एकीला गिफ्ट दिलं की दुसरी बसते रुसून…
आता नऊ बायका म्हटल्यावर कुणाला किती वेळ द्यायाचा हा त्याच्यासमोर होता. त्यावरही त्याने उत्तर शोधून काढलंय. त्याने यासाठी एक विशेष टाईमटेबल प्लॅन केलंय.
मुंबई : अशोक सराफ (Asok Saraf) यांचा ‘दोन बायका फजिती ऐका’ हा सिनेमा आठवतो का? या सिनेमात दोना बायकांमुळे त्यांची झालेली फजिती आजही तितक्याच आवडीने पाहिली जाते. त्यानंतर तीन बायकांमध्ये फसलेले मकरंद अनासपुरे आपण ‘3 बायका फजिती ऐका’मध्ये पाहिलेत. पण याहून कहर असलेली एक कथा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका माणसाने चक्क 9 बायकांशी लग्न केलंय. ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने 9 महिलांशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. आर्थर ओ उर्सो असं या तरूणाचं नाव आहे. त्याचा त्याच्या बायकांसोबतचा फोटो सध्या व्हायरल (Viral news) होत आहे
9 बायकांसोबत लग्नगाठ
ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने 9 महिलांशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. आर्थर ओ उर्सो असं या तरूणाचं नाव आहे. त्याचा त्याच्या बायकांसोबतचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
चांगला वेळ घालवता यावा म्हणून टाईमटेबल
आता नऊ बायका म्हटल्यावर कुणाला किती वेळ द्यायाचा हा त्याच्यासमोर होता. त्यावरही त्याने उत्तर शोधून काढलंय. त्याने यासाठी एक विशेष टाईमटेबल प्लॅन केलंय. त्यानुसार तो प्रत्येकीला वेळ देत होता. पण मग हे टाईमटेबल फॉलो करायला त्याला अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याने या टाईमटेबलला केराची टोपली दाखवली. त्याचं कारण त्याने स्वत:च सांगितलं आहे. “कधीकधी मला असं वाटायचं की मी दबावाखाली माझ्या बायकांसोबत प्रेम करतो किंवा रोमान्स करतो.तर काही वेळा सगळ्यांना वेळ देऊनही कुणाची ना कुणाची तक्रार असाचीच की मला वेळ देत नाही म्हणून मग मी हे टाईमटेबल मोडीत काढलं.”
आपल्या बायको गिफ्ट द्यावं असं कुणाला नाही वाटणार? त्यामुळे मी त्यांना गिफ्ट द्यायचो पण मग एकीला महागडं गिफ्ट दिलं की दुसरी नाराज व्हायची म्हणून मग माझी जरा अडचण होते, असं त्याने सांगितलं.