जन्मल्यानंतर मृत घोषीत केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी अचानक रडू लागले, यानंतर मात्र
बाळ किंवा मुलाची आई दोन्हीपैकी एकालाच वाचवता येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते, दुर्दैवाने बाळाची काहीच हालचाल होईना म्हणून डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले, परंतू नियतीच्या मनात काळी वेगळेच होते.
आसाम | 5 ऑक्टोबर 2023 : एका गर्भवती महिलेला प्रसव कळा सुरु झाल्याने तिला मंगळवारी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतू आई किंवा बाळ यापैकी एकालाच वाचवू शकतो असे डॉक्टरांनी सांगितले. हृदयावर दगड ठेवत त्यांनी डॉक्टरांना प्रसुती करण्याची परवानगी दिली. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्या बाळाच्या हालचाली होत नव्हत्या, त्यामुळे नव्या बाळाच्या आगमनाने आनंदी झालेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. दु:ख गिळून त्यांनी बाळाच्या अत्यसंस्काराची तयारी सुरु केली. परंतू चमत्कार घडला.
मंगळवारी सिलचर येथील एका खाजगी दवाखान्यात एका गर्भवती महिलेला प्रसवकळा सुरु झाल्यानंतर दाखल करण्यात आले होते. परंतू प्रसूतीनंतर ते बाळाला वाचवू शकले नाहीत. त्यांना बुधवारी सकाळी बाळाचा कलेवर आणि मृत्यूप्रमाणपत्रही देण्यात आले. सिलचर येथे पोहचल्यावर कुटुंबियांनी हालचा झाल्याने बाळाचा मृतदेह ठेवलेले पॅकेट उघडले तर त्यात बाळ रडताना आढळल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानंतर मालिनीबिल परिसरात डॉक्टरांच्या विरोधात संताप उसळला. डॉक्टरांनी नीट न तपासता बाळाला कसे काय ? मृत घोषीत केले याचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात पोलिसांकडे तक्रा केली आहे.
रुग्णालयाच्या विरोधात गुन्हा
या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या नवजात बाळाला मृत घोषीत करण्यापूर्वी आठ तास निरीक्षणाखाली ठेवले होते, त्यानंतरच त्याला मृत घोषीत केल्याचा दावा केला आहे. वारंवार तपासून खात्री केल्यानंतर या बाळाला मृत घोषीत केल्याचा दावा एका कर्मचाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी बाळाच्या कुटुंबियांनी रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.