VIDEO : स्टंट करणे महागात पडले, व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल
हा थरारक व्हिडिओ एका युजरकडून आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. केवळ 13 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 13 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
स्टंटबाजी करणे हा आजकाल जणू ट्रेंडच बनला आहे. चालत्या वाहनांमध्ये स्टंटबाजी करणे हा तर अनेक स्टंटबाजांचा आवडता शोक आहे. या स्टंटबाजांचे कारनामे पाहून लोक तोंडात बोट घालतात. खासकरुन बाईकस्वारांचा स्टंट पाहून अंगावर काटा उभा राहतो. हाच स्टंट कधी कधी त्यांना संकटात नेतो. स्टंटबाजी करताना अनेकदा तरुण अपघाताचे बळी ठरतात. मात्र तरीही स्टंटबाज यातून धडा घेताना दिसत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल.
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाईकवर स्टंट करुन दाखवतोय
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चारचाकी बाईकवर स्टंट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. स्टंट करण्याच्या नादात तो समोर पहायला विसरतो आणि याचमुळे तो अपघाताचा बळी ठरतो.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, हा व्यक्ती बाईकची पुढची दोन्ही चाके वर उचलून स्टंट करत आहे. असे केल्याने तो खूप आनंदी दिसत आहे. मात्र स्टंटबाजीच्या नादात समोरुन येणाऱ्या भरधाव कारला धडकतो.
Play stupid games………. pic.twitter.com/jI0XJvPIeo
— Vicious Videos (@ViciousVideos) November 9, 2022
धडक इतकी जोरदार होती की तो व्यक्ती हवेत उडून थोड्या अंतरावर जाऊन पडतो. घटनेची गंभीरता पाहता बाईकवरील व्यक्ती गंभीर जखमी झाली असावी, असे दिसते. मात्र, त्याला किती गंभीर दुखापत झाली आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही.
व्हिडिओला आतापर्यंत 13 हजारांहून अधिक व्ह्यूज
हा थरारक व्हिडिओ एका युजरकडून आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. केवळ 13 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 13 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.
हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘मला समजत नाही की हे सर्व करून लोकांना काय मिळते’, तर एका यूजरने लिहिले की, कोणीतरी त्या व्यक्तीला मदत करा.