VIDEO | एका व्यक्तीने गटारात फेकली सिगारेट, झाला भीषण स्फोट, समोर आला भयानक व्हिडिओ
Viral Video : सिगारेट ओढल्यानंतर तुम्ही ती न विझवता कुठेही फेकून देता. परंतु एका तरुणाने सिगारेट खड्ड्यात फेकली आणि स्फोट झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई : आपण केलेल्या चुकांचे (Trending Video) परिणाम आपल्याला पाहायला मिळतात असं म्हटलं जातं. परंतु ते एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) अधिक व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे एका व्यक्तीने एक छोटीसी चुकी केल्याचं त्या व्हिडीओ स्पष्ट दिसतं आहे. हा व्हिडीओ (Viral Video) पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्हाला एक व्यक्ती सिगारेट पित असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यावेळी ती व्यक्ती शिगारेट पीत आहे, त्या व्यक्तीची सिगारेट ओढून झाल्यानंतर तिथं असलेल्या एका छोट्या खड्ड्यात ती टाकली आहे. त्या व्यक्तीला असं वाटलं आहे की, तो एक नॉर्मल खड्डा आहे. त्यामुळे ती व्यक्ती सिगारेट न विझवता फेकतो. तो खड्डा इतका खतरनाक आहे की, काही सेकंदात स्फोट होतो.
या कारणामुळे झाला स्फोट
त्या व्यक्तीने कसलाही विचार न करता गटारात सिगारेट फेकलं आहे. ज्यावेळी ते सिगारेट खड्ड्यात जातं. त्यावेळी जोराचा स्फोट झाला आहे. त्यावेळी ती व्यक्ती तिथचं तोंडावर पडली आहे. एक गोष्ट चांगली झाली की, त्यावेळी तिथल्या चांगल्या जमिनीचा स्फोट झाला आहे. त्या स्फोटनंतर सगळीकडं धुरळा पाहायला मिळाला आहे. त्या व्यक्तीची एक छोटी चुकी झाली, त्याचे परिणाम त्याला तिथेचं पाहायला मिळाले. तिथं एक गटार होतं.
Man throws a cigarette down a sewer and causes an explosion pic.twitter.com/Cd3GfaOxAF
— CCTV IDIOTS (@cctvidiots) August 6, 2023
ती व्यक्ती झाली जखमी
ज्यावेळी तिथं स्फोट झाला, त्यावेळी ती व्यक्ती तिथून शरीर घासत उठत आहे. झालेल्या स्फोटामुळे तो तरुण चांगलाचं जखमी झाला आहे. अशी माहिती समजली आहे की, गटारातून मिथेन गॅस निघते. तो अधिक ज्वलनशील असतो.