Dream Job: कँडी खाण्यासाठी मिळतो तब्बल 61 लाख रुपये पगार तर च्युइंगम चघळून महिन्याला करतेय 67 हजारांची कमाई
बहुतेकांनी त्यांच्या आवडी-निवडीच्या माध्यामांनाच कमाईचे साधन बनवले आहे. अशा प्रकारच्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी कॅनडाची एक कंपनी जबरदस्त ऑफर देतेय. कँडी खाण्यासाठी ही कंपनी तब्बल 61 लाख रुपयांच्या पगाराचे पॅकेज देतेय. तर दुसरीकडे जर्मरनीतील एक तरुणी च्युइंगम चघळून महिन्याला करतेय 67 हजारांची कमाई करतेय
नवी दिल्ली : सध्या बेरोजगारी इतकी वाढलेय की अनेक जण नोकरीच्या शोधात आहे. यामुळेच अनेक जण व्यवसाच्या माध्यमातून पैसे कामत आहेत आहेत. तर अनेकांनी काही तर हटके करत वेगवेगळ्या माध्यामातून कमाई सुरु केली आहे. तर बहुतेकांनी त्यांच्या आवडी-निवडीच्या माध्यामांनाच कमाईचे साधन बनवले आहे. अशा प्रकारच्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी कॅनडाची एक कंपनी जबरदस्त ऑफर देतेय. कँडी खाण्यासाठी ही कंपनी तब्बल 61 लाख रुपयांच्या पगाराचे पॅकेज देतेय. तर दुसरीकडे जर्मरनीतील एक तरुणी च्युइंगम चघळून महिन्याला करतेय 67 हजारांची कमाई करतेय
कॅनडाच्या कंपनीची 61 लाखाच्या पगाराची ऑफर
सोशल मिडीयावर सध्या एका आणखो जॉबची चर्चा सुरू आहे. कॅनडाची एक कंपनी स्वीट लव्हर अर्थात गोड पदार्थप्रेमींसाठी ड्रीम जॉब देत. ही कंपनी कँडी खाण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना एका वर्षाचा तब्बल 61 लाख रुपये पगार देणार आहे. ज्यांना कँडी आणि चॉकलेट्स खायला खूप आवडतात, त्यांच्यासाठी तर ही नोकरी म्हणज “सोने पे सुहागा” अशीच म्हणावी लागेल.
कँडी आणि चॉकलेट्स खाण्याचे काम
या कंपनीत नोकरी करणाऱ्यांना कँडी आणि चॉकलेट्स खाण्याचे पैसे मिळणार आहेत. त्या बदल्यात वर्षाकाठी 61 लाख रुपये पगार दिला जाणार आहे. या कंपनीला कॅंडीज आवडणारे कर्मचारी हवे आहेत. कर्मचाऱ्याला कॅंडीज खाण्याच्या बदल्यात पैसे दिले जातील.
कँडी फनहाऊस कंपनी देतेय नोकरी
कँडी फनहाऊस कंपनी ही नोकरीची अनोखी ऑफर देत आहे. येथे काम करणाऱ्यांना चीफ कँडी ऑफिसर नोकरी दिली जाणार आहे. ऑनलाइन रिटेलर कँडी फनहाऊस कंपनी चॉकलेट बारपासून कँडीपर्यंत सर्व काही विकते. येथे जॉब करणाऱ्यांना त्यांच्या कँडीजची आणि चॉकलेट्सची टेस्ट करुन योग्य रिव्ह्यू द्यायचा आहे.
5 वर्षांचे मूलदेखील या नोकरीसाठी अर्ज करू शकते
5 वर्षांचे मूलदेखील या नोकरीसाठी अर्ज करू शकते. या पदासाठी 18 वर्षांवरील व्यक्तीची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे यासाठी कर्मचार्यांना ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, हे काम घरूनच करायचं आहे. या पदासाठी 18 वर्षांवरील व्यक्तीची आवश्यकता नाही
च्युइंग-गम खाऊन दर महिन्याला तब्बल 67 हजार रुपयांची कमाई
जर्मनीतील ज्युलिया नावाची महिला च्युइंग-गम खाऊन दर महिन्याला तब्बल 67 हजार रुपयांची कमाई करते. ही महिला एकाच वेळी तब्बल 30 च्युइंग-गम खाते. त्यापासून मोठा बबल तयार करते. त्या बबलचे व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओ क्लिप्स विकून तिला हे पैसे मिळतात. महिन्याला तिला च्युइंग-गम खरेदीसाठी तिला फक्त 480 रुपये खर्च येतो आणि तिला त्यातून तिला तब्बल 67 हजार रुपये मिळतात. प्रोफेशनल फोटोग्राफर्सकडून ती मोठमोठे बबल्स बनवतानाचे व्हिडिओ शुट करुन घेते. ती तीच्या सोशल मिडीया अकाऊंटवर देखील व्हिडिओ शेअर करत असते.