Video : सात वर्षांच्या मुलाने उडवलं विमान, ‘छोट्या पायलट’चं सर्वत्र कौतुक…

हा व्हीडिओ 310 पायलट या यूट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडीओमध्ये एक सात वर्षांचा मुलगा पायलटच्या सीटवर बसलेला दिसतोय.

Video : सात वर्षांच्या मुलाने उडवलं विमान, 'छोट्या पायलट'चं सर्वत्र कौतुक...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 3:14 PM

मुंबई : विमान उडवणं ही अनेकांची इच्छा असते. पण त्याचा खर्च, लागणारा वेळ, धाडस पाहता अनेकजण हे आपल्या आवाक्यातलं नाही, असं म्हणत त्याकडे पाठ फिरवतात. पण काही लोक आपलं हे स्वप्न पूर्ण करतात. आम्ही तुम्हाला अश्याच ध्येयवादी लहानग्या पायलटची गोष्ट सांगणार आहोत त्याने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी विमान चालवलंय. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल (Plane Video) होत आहे. यामध्ये एक 7 वर्षांचा मुलगा विमान उडवताना दिसत आहे. या मुलाचं टॅलेंट पाहून सगळेच आश्चर्यचकित होत आहेत. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

धाडसी चिमुकला पायलट

या चिमुकल्या पायलटचं सध्या सोशल मीडियावर जोरदार कौतुक होतंय. तो विमान उडवत असताना त्याच्या चेहऱ्यावर तसूभरही चिंता दिसत नाहीये. तो ट्रेन झालेल्या पायलटप्रमाणे हवेत त्याच वेगाने विमान उडवतोय. नियंत्रण कक्षातही तो बोलताना दिसतोय. यादरम्यान तो आपल्या को-पायलटसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. हा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हीडिओ 310 पायलट या यूट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडीओमध्ये एक सात वर्षांचा मुलगा पायलटच्या सीटवर बसलेला दिसतोय. तो आनंदाने विमान उडवत आहे. एवढ्या लहान वयात मुलाचं हे कौशल्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याला विमान चालवायला आवडत असल्याचं बोललं जात आहे.

कौतुकाचा वर्षाव

या व्हीडिओला अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हा 25 लाख लोकांनी पाहिला आहे. तर 17 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत या लिटिल पायलटत कौतुक केलंय. एकाने म्हटलंय की, “पायलट, तुझ्या धाडसाला सलाम!” दुसरा म्हणतो, “तुला बघून मलाही विमान उडवण्याची इच्छा होतेय.”

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.