Terrible Video: झपाटलेली शाळा! चित्र-विचित्र हावभाव आणि आरोडा-ओरडा करत मुली बेशुद्ध झाल्या; शाळेतील शिक्षकांनी डॉक्टर ऐवजी मांत्रिकाला बोलावले

उत्तराखंडमधील बागेश्वर ब्लॉकमधील रायखोली ज्युनियर हायस्कूलमध्ये हा खळबळ प्रकार घडला आहे. अचानक या शाळेतील इयत्ता आठवीच्या पाच ते सहा विद्यार्थिनींनी आरडाओरडा करायला लागल्या. यांनतर रडता रडता त्या बेशुद्ध झाल्या. या घटनेमुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षकांनी पालकांना शाळेत बोलावून विद्यार्थिनींना घरी पाठवले. या घटनेला मास हिस्टेरिया असं म्हंटल जाते. मास हिस्टेरिया म्हणजे सामूहिकरीत्या एका विशीष्ट प्रकारची कृती करणे. हा एक प्रकारे मानसिक आजार आहे.

Terrible Video: झपाटलेली शाळा! चित्र-विचित्र हावभाव आणि आरोडा-ओरडा करत मुली बेशुद्ध झाल्या; शाळेतील शिक्षकांनी डॉक्टर ऐवजी मांत्रिकाला बोलावले
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 8:43 PM

नवी दिल्ली : महेश कोठारे यांचा झपाटलेला हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय आहे. यामध्ये एक झपाटलेला बाहुला दाखवण्यात आल्याची काल्पनिक कथा आहे. भूत, प्रेत, आत्मा याबाबत अनेक दंतकथा आपण ऐकतो. उत्तराखंडमध्ये(Uttarakhand) मात्र एका शाळेलाच झपाटले आहे. या शाळेतील मुली अचानक चित्र विचित्र हाव करू लागल्या. यानंतर आरडा-ओरडा करत या मुली शुद्ध झाल्या. शाळेतील शिक्षकांनी डॉक्टरांऐवजी एका मांत्रिकाला बोलावून या मुलींवर उपचार केले. ज्ञान मंदिरात विज्ञान विरोधी कृती झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अचानक या मुलींची मानसिक स्थिती बिघडल्याने त्यांनी अशा प्रकारचे विचित्र कृत्य केले आहे. मानसोपचार तज्ञांच्या मदतीने या मुलींचे काऊन्सलींग करणे गरजेचे असताना मांत्रिकाच्या मदतीने थेट शाळेतच अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कृत्य केले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मांत्रिक विद्यार्थींनींवर अंगारे-धुपारे उडवत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

मास हिस्टेरिया

उत्तराखंडमधील बागेश्वर ब्लॉकमधील रायखोली ज्युनियर हायस्कूलमध्ये हा खळबळ प्रकार घडला आहे. अचानक या शाळेतील इयत्ता आठवीच्या पाच ते सहा विद्यार्थिनींनी आरडाओरडा करायला लागल्या. यांनतर रडता रडता त्या बेशुद्ध झाल्या. या घटनेमुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षकांनी पालकांना शाळेत बोलावून विद्यार्थिनींना घरी पाठवले. या घटनेला मास हिस्टेरिया असं म्हंटल जाते. मास हिस्टेरिया म्हणजे सामूहिकरीत्या एका विशीष्ट प्रकारची कृती करणे. हा एक प्रकारे मानसिक आजार आहे.

मुलांचे पालक शाळेत पूजा करतात

मुलांच्या या चित्रविचित्र हालचाली पाहून शाळेतच मांत्रिक बोलवण्यात आला. या घटनेची माहिती तात्काळ मुलांच्या पालकांना देण्यात आली. पालक आपल्यासह मांत्रिकही शाळेत घेऊन आले. यावेळी या मांत्रिकांने मंत्रोच्चार करत मुलींवर अंगारा उडवला. यानंतर मुली शांत झाल्याचा दावा केला जात आहे.

अचानक मुली रडायला लागल्या

मुली अचानक रडत-रडत विचित्र हावभाव कशा काय करु लागल्या हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेने शिक्षण विभागाची धांदल उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांचे पथकही बागेश्वरच्या शाळेत पोहोचले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगीतले की मुली आणि मुलांसह काही विद्यार्थी असे असामान्य वर्तन करत होते. विद्यार्थी रडत होते आणि ओरडत होते. अनेकजण थरथरतही होते.

उत्तराखंडमधील अनेक शाळांमध्ये घडलेत असे प्रकार

उत्तराखंडमधील अनेक शाळांमध्ये असे प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. अल्मोडा, पिथौरागढ, चमोली या जिल्ह्यामधील अनेक सरकारी शाळांमध्ये असे प्रकार घडलेत. या घटनेनंतर प्रशासनासह डॉक्टरांचे पथक आज ज्युनिअर हायस्कूलमध्ये पोहोचले. हे पथक विद्यार्थिनींचे समुपदेशन करणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.