कमाले! आठावर चार, चार झाले…चोवीसनंतर अचानकच पंचेचाळीस आले! हळू हळू जसा मूड, तसे पाढे जाऊ लागले

असाच एक व्हिडीओ वायरल होतोय. ज्यात एक लहानसा मुलगा मस्त पाढे म्हणतोय, ज्यात कशाचाच कशाला ताळमेळ नाही. लोकांनी हा व्हिडीओ बघून विचारलंय नेमकं ह्याला पाढे शिकवले कुणी. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातलाय.

कमाले! आठावर चार, चार झाले...चोवीसनंतर अचानकच पंचेचाळीस आले! हळू हळू जसा मूड, तसे पाढे जाऊ लागले
याचे अतरंगी पाढे तुम्हाला नक्की आवडतील
Image Credit source: Instagram
Updated on: Jun 06, 2022 | 11:55 AM

लहान मुलं पण अतरंगी असतात. कधी परीक्षेत (Examination) देवाचं नावच काय घेतील आणि पेपर सोडवतील. कधी पाढे उलटे म्हणतील, कधी शाळेत मारामारी करतील.आता तर मुलं निरागस राहिलीत की नाही असा प्रश्न पडायला लागलाय.लहान मुलांचे वायरल व्हिडीओ (Viral Video) पाहून तर कधी ते निरागस (Innocent) वाटतात तर कधी एकदम समजूतदार. असाच एक व्हिडीओ वायरल होतोय. ज्यात एक लहानसा मुलगा मस्त पाढे म्हणतोय, ज्यात कशाचाच कशाला ताळमेळ नाही. लोकांनी हा व्हिडीओ बघून विचारलंय नेमकं ह्याला पाढे शिकवले कुणी. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातलाय.

अतरंगी पाढे

कधी तुम्हाला शाळेत शिकवलंय का, अकरा अधिक बारा, बारा होतात? 24 नंतर लगेच 45 येतात. या मुलाला शिकवलंय. कुणी शिकवलं कुठून शिकला माहित नाही पण याचे अतरंगी पाढे तुम्हाला नक्की आवडतील. पण हा व्हिडीओ तुमच्या मुलांना दाखवू नका नाहीतर तेही असेच पाढे म्हणायला लागतील आणि मग तुम्हालाच ते पाढे सुधारत बसावे लागतील.

म्हशींची होणार DNA चाचणी

उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) एका शेतकऱ्याची म्हैस हरवली. ती म्हैस लहान असतानाच हरवली (Stolen Buffalo)त्याला नंतर तीन महिन्यांनी ती म्हैस सापडली सुद्धा पण लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांत तक्रार करून सुद्धा पुढे काहीच करता आलं नाही. काही महिने गेले आणि अर्थातच ती म्हैस मोठी झाली. मग आता त्या म्हशीला ओळखायचं कसं? माणसांची DNA टेस्ट केली जाते हे आपण ऐकून आहोत. पण कधी ऐकलंय का की प्राण्यांची ओळख पटवायला देखील DNA टेस्ट केली जातीये. कधी कुणी विचार करू शकलं असेल का की सायन्स इतक्या पुढे जाऊ शकतं की एखाद्या माणसाचा हरवलेला पाळीव प्राणी सुद्धा सायन्सच शोधून देऊ शकतो. कमाल आहे हे! ज्याच्याकडे ती म्हैस आहे तो शेतकरी सुद्धा “म्हैस माझीच” असा दावा करतोय. ज्याची ती म्हैस हरवलीये त्याचाकडे त्या म्हशीची आई सुद्धा आहे. अशा वेळी जिल्ह्याच्या एस.पी ने शक्कल लढवली. DNA टेस्ट करण्याचा आदेश दिलाय. आता या म्हशींची DNA टेस्ट होणार आहे आणि निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे.