काय काय बघावं लागेल ‘या’ महाराष्ट्रात, व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल…
सोशल मीडियावर बस कंडक्टरचा व्हिडीओ व्हायरल. बसमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे कंडक्टर थेट प्रवाशी सीटवर चढून तिकीट काढत आहे.
व्हायरल व्हिडीओ : सध्या इन्स्टाग्रामवर एक बस कंडक्टरचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे बस कंडक्टर हा तिकिट काढण्यासाठी चक्क प्रवाशी बसलेल्या सीटवर चढून तिकिट काढताना दिसत आहे. बस कंडक्टरची ही कला पाहून बसमधील प्रवाशी देखील थक्क झाले. बसमधील एका प्रवाश्याने हा व्हिडीओ काढला असून तो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मालेगावमधील असल्याचं म्हटलं जात आहे.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
बस कंडक्टरच्या व्हिडीओची का होतेय चर्चा?
सध्या महिलांना सरकारकडून हाफ तिकिट जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या सरकारी बसमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. अशातच एक बस कंडक्टरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिकिट काढण्यासाठी या बस कंडक्टर जे केलं ते पाहून सर्व त्याचे कौतुक करत आहेत. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर आधुनिक भारत, क्या क्या देखना पडेगा अशा कमेंट्स बघायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात या व्हिडीओला पंसती मिळत आहे.