गायीची शेपटी पिळवटत होता तरुण, गायीने जे केले ते पाहून तुम्हीही म्हणाल बरे झाले !
सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक व्यक्ती गायीला त्रास देत आहे. यामुळे गायीने त्रासून त्या व्यक्तीला चांगलाच प्रसाद दिला आहे.
आपल्या देशात गायीला गोमाता (Gomata) संबोधले जाते. गायीची पूजा करण्याची परंपरा आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देवांचा निवास आहे असं हिंदू धर्मात (Hindu Religion) म्हटले जाते. यामुळे गायीला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. आजही खेड्या-पाड्यात घरात बनलेली पहिली चपाती किंवा भाकरी गायीला दिली जाते. कारण गायीला भाकरी दिली तर ती देवापर्यंत पोहचल्याचा समज आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते, असे म्हटले जाते. मात्र याच गायीला डिवचले तर ती तुम्हाला हानीही (Harm) पोहचवू शकते.
सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक व्यक्ती गायीला त्रास देत आहे. यामुळे गायीने त्रासून त्या व्यक्तीला चांगलाच प्रसाद दिला आहे. हा व्हिडिओ तुमचे मन विचलित करु शकतो.
Kalesh With Animal (Cow-Gang Assemble ?) pic.twitter.com/JaOHU7WjRo
— r/Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 13, 2022
काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गल्लीत उभ्या असलेल्या गायीला आपल्या पायाने मारत आहे. त्यानंतर गायीची शेपटी पिळवटून ती ओढत तिच्या मागे फिरत होता. अखेर या व्यक्तीच्या या त्रासाला गाय वैतागली आणि चांगलीच चिडली. यानंतर गायीने जे केले ते पाहून तुम्ही म्हणाल योग्य झाले.
चिडलेल्या गायीने केले असे
चिडलेल्या गायीने लगेच तरुणाला त्याच्या कर्मांची शिक्षा दिली. गायीने तरुणाला शिंगावर घेत खाली आपटले. त्यानंतर त्याला पायाखाली तुडवून काढले. गायीचे रौद्ररुप पाहून तेथे उपस्थित अन्य लोकही घाबरले आणि तेथून पळू लागले.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्सने समाधान व्यक्त केले आहे. जैसी करनी वैसी भरनी, अशा कमेंट्स युजर्स व्हिडिओवर देत आहेत. सोशल मीडियात या तरुणावर संताप व्यक्त केला जात आहे.