चक्क सिंहांसोबत फुटबॉल खेळला पट्ठ्या, व्हिडिओ पाहून तुम्हीही तोंडात बोटे घालाल

सोशल मीडियामध्ये सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एका धाडसी व्यक्तीने चक्क सिंह आणि सिंहणीसोबत खेळण्याचे मोठे धाडस दाखवले आहे. त्याचा हा पराक्रम पाहता कुणीही तोंडात बोटे घालून थक्क होईल.

चक्क सिंहांसोबत फुटबॉल खेळला पट्ठ्या, व्हिडिओ पाहून तुम्हीही तोंडात बोटे घालाल
सिंहांसोबत फुटबॉल खेळला पट्ठ्याImage Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 5:27 PM

जंगली प्राण्यांचे नुसते नाव घेतले तरी अनेक लोकांना धडकी भरते. जर ते जंगली प्राणी (Wild Animal) अशा लोकांसमोर उभे ठाकले तर त्यांची काय परिस्थिती होत असेल? मनुष्यच काय, प्राणी देखील हिंस्र प्राण्यांसमोर उभे राहायला धजावत नाहीत. सिंह (Lion) हा जंगलाचा राजा मानला जातो. सिंहाच्या प्रचंड दहशतीमुळेच तो राजाचा रुबाब दाखवून जंगलात वावरत असतो. या राजापुढे दूर अंतरावर देखील उभे राहणे फार धाडसाचे मानले जाते. प्राणी संग्रहालयामध्ये सिंह पिंजऱ्यामध्ये बंद असला तरी पर्यटकांना (Tourist) त्या सिंहाची भीती कायम असते.

सोशल मीडियामध्ये सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एका धाडसी व्यक्तीने चक्क सिंह आणि सिंहणीसोबत खेळण्याचे मोठे धाडस दाखवले आहे. त्याचा हा पराक्रम पाहता कुणीही तोंडात बोटे घालून थक्क होईल.

सुटाबुटातील व्यक्ती सिंह दाम्पत्यासोबत खेळतोय फुटबॉल!

सिंहासमोर उभे राहण्याचे धाडस एकवेळ आपल्या पचनी पडू शकते, पण कुणी सिंह आणि सिंहणीसोबत फुटबॉल खेळल्याचे कधी ऐकले आहे का? अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही. मात्र ट्विटरवर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ बघितला सुटाबुटातील व्यक्तीच्या पराक्रमावर विश्वास ठेवावाच लागत आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओमध्ये सूटबूट परिधान केलेली व्यक्ती सिंह दाम्पत्यासोबत अगदी बिनधास्त फुटबॉल खेळताना दिसत आहे. हा खेळ जणू स्वतःच्या जीवाशीच खेळ असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवली आहे. याचवेळी अनेक लोक त्या व्यक्तीच्या धाडसाला सलाम ठोकत आहेत.

विशेष म्हणजे सिंहाच्या तावडीतील फुटबॉल हिसकावून घेतानाही दिसत आहे. सिंहाला त्याच्यासमोर येणारा कोणताही प्राणी हा त्याच्यासाठी भक्ष्य असतो. त्यामुळे सिंहाच्या तावडीत सापडलेला कोणताही प्राणी, मग तो मनुष्य का असेना. सुखरूप सुटका होण्याची शक्यता फारच दुर्मिळ असते.

सोशल मीडियातील वायरल व्हिडिओमध्ये हाच दुर्मिळ योग आला आणि सूटबुटातील तरूण फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटल्यानंतर सिंहाच्या तावडीतून सुखरूप सुटला आहे.

सोशल मीडियात धाडसाचे कौतुक

सिंहासमोर उभे राहण्याची धमक असावी लागते. पण वायरल व्हिडिओतील सुटाबुटातील तरुणाने तर यापुढे मजल मारली आहे. तरुण चक्क सिंह आणि सिंहसोबत फुटबॉल खेळतोय. त्याच्या या धाडसाची सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहवा केली जात आहे.

ट्विटर आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. अनेकांनी हे कसे शक्य आहे? असा आश्चर्यजनक सवाल उपस्थित केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.