आता हा कुठून आला ‘रहस्यमय साप’; व्हिडिओ पाहून कोणीही कोड्यात पडेल

निसर्गात बरीच रहस्य लपलेली आहे. व्हिडिओतील साप हे देखील एक रहस्यच मानले जात आहे. कारण या आधी अशा प्रकारचा साप कोणीही पाहिलेला नसेल. हा साप गवतासारखा आहे.

आता हा कुठून आला 'रहस्यमय साप'; व्हिडिओ पाहून कोणीही कोड्यात पडेल
आता हा कुठून आला 'रहस्यमय साप'Image Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 9:50 PM

पृथ्वीतलावर बरेच प्राणी आहेत. त्यातही सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्याही मोजदाद न करण्याएवढी आहे. या प्राण्यांविषयी असलेली गुपिते, रहस्य जाणून घेण्यासाठी कुणालाही उत्सुकता असते. सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या बऱ्याच व्हिडिओमधून ही गुपिते उलगडली जातात. सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला सापाचा व्हिडिओ पाहून तुम्ही कोड्यात पडाल. हा साप आहे की नेमकं गवतच? हा एलियन तर नाही ना? असे बरेच प्रश्न तुमच्या मनात रुंजी घालतील. सोशल मीडियातील व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाहीत.

परग्रहातून आलेला पाहुणा तर नाही ना!

निसर्गात बरीच रहस्य लपलेली आहे. व्हिडिओतील साप हे देखील एक रहस्यच मानले जात आहे. कारण या आधी अशा प्रकारचा साप कोणीही पाहिलेला नसेल. हा साप गवतासारखा आहे. त्याचा रंग देखील गवतासारखा हिरवा आहे. त्यामुळे तो हिरव्या रानात लपला असताना कुणाच्याही लक्षात येऊ शकणार नाही.

याबाबत लोक व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये मजेदार वेगवेगळी मते नोंदवत आहेत. काहींच्या मते हा समुद्र जीव आहे, तर काहींना हा साप परग्रहातून तर पृथ्वीवर आली नाही ना, अशी शंका सतावत आहे.

हे सुद्धा वाचा

सापाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल

हा साप कितपत विषारी आहे? याची पडताळणी करणे आवश्यक आहे, असेही मत अनेकांनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर मांडले आहे. सोशल मीडियातील या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर रहस्यमय सापाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आला आहे.

सर्वजण पहिल्यांदाच अशा प्रकारचा साप पाहत आहेत. त्यामुळे स्वतः व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्र मंडळी आणि नातेवाईकांना देखील व्हिडिओ शेअर केला जात आहे.

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियामध्ये सापाचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याला प्रतिसाद देखील वाढता आहे. याला कारण म्हणजे अनेक लोक सापाला प्रत्यक्ष पाहण्याची हिंमत करत नाहीत.

हे लोक सापाची नेमकी दहशत काय असते? त्याचे विविध रूप कसे असते? तो कशाप्रकारे दंश करतो? अशा विविध प्रश्नांची उत्तरे लोकांना सापाच्या व्हिडिओमधून मिळत असतात.

थायलंडमध्ये आढळला रहस्यमय साप

रहस्यमय सापाचा व्हायरल व्हिडिओ हा थायलंडमधील असल्याचे उघडकीस आले आहे. पूर्वोत्तर थायलंडमध्ये हा साप दिसला आहे. तेथील स्थानिक संशोधक या सापाच्या हालचाली तसेच इतर बाबींचा अभ्यास करत आहेत.

एका घराशेजारील पाणथळ जागेवरती हा रहस्यमय साप दिसला आहे. हा साप सध्या एका जारमध्ये ठेवण्यात आला आहे. साप जवळपास दोन फूट लांब असून या सापाला खाद्य म्हणून मच्छी खायला घातले गेले आहे.

एका घरामध्ये ठेवण्यात आलेला हा साप पाहण्यासाठी थायलंडमधील प्राणी प्रेमी गर्दी करत आहेत. त्याचवेळी सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला आहे. रहस्यमय साप पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा उभा राहील. सापाविषयीची बरीच रहस्य जाणून घेताना हा व्हिडिओ पाहणे कधीही रंजक ठरेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.