VIDEO : ‘या’ चिमुकलीचा डान्स पाहिला का? तुम्हीही थक्क व्हाल !
गाण्याचे, डान्सचे वअनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या एका चिमुकलीचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूपच आवडत आहे.
सोशल मीडिया असे माध्यम आहे जिथे प्रत्येक जण आपली कला सादर करुन लोकांपर्यंत पोहचू शकते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला जण सोशल मीडियावर आपल्या कला सोशल मीडियावर सादर करायला आवडतात. गाण्याचे आणि डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या एका चिमुकलीचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूपच आवडत आहे. व्हिडिओतील चिमुकलीच्या डान्सच्या अदा पाहून प्रत्येक जण तिचे कौतुक करत आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
व्हिडिओमध्ये शाळेचा गणवेश घातलेली एक विद्यार्थिनी शाळेतील स्टेजवर ‘मेरा बलमा बडा सायना’ या राजस्थानी गाण्यावर नाचताना दिसत आहे. तेथे उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी टाळ्या वाजवून मुलीला प्रोत्साहन देत आहेत.
प्रतिभा देखिये।?? pic.twitter.com/XzqxFCSAIm
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 9, 2022
व्हिडिओतील मुलीचे हावभाव आणि हालचाली अगदी पाहण्यासारख्या आहेत. मुलगी केवळ गाण्यावर डान्सच करत नाही तर हावभावही चांगले करत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलीने लहान वयात ज्या पद्धतीने डान्स केला आहे, ते पाहता ती लहान आहे असे वाटत नाही. पण तिचा डान्स मोठ्यांनाही हरवतो.
व्हिडिओ एका शाळेतील आहे. शाळेत काहीतरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त मुलीने डान्स परफॉर्मन्स सादर केला.
व्हिडिओला 90 हजारांहून अधिक व्ह्यूज
हा व्हिडिओ एका युजरकडून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 90 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवर युजर्स कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.