VIDEO : कुत्र्याची निष्ठा पहा ! घरातील सदस्यांचा जीव वाचवण्यासाठी सापाशी दिली झुंज
सोशल मीडियावर 55 सेकंदाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून कुत्रीच्या इमानदारीची सर्वत्र चर्चा होत आहे. ज्युली असे या कुत्रीचे नाव आहे.
मिर्झापूर : कुत्रा किती इमानदार प्राणी आहे याची प्रचिती आपल्याला अनेकदा येते. असाच एक कुत्रीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मालकाच्या संरक्षणासाठी एक पाळीव कुत्री मालकाच्या घरात साप जाऊ नये म्हणून सापाशी झुंज देताना दिसत आहे. साप मरेपर्यंत कुत्र्याने सापाला सोडले नाही.
सोशल मीडियावर 55 सेकंदाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून कुत्रीच्या इमानदारीची सर्वत्र चर्चा होत आहे. ज्युली असे या कुत्रीचे नाव आहे. हा व्हिडिओ मिर्झापूरमधील उमेश कुमार दुबे यांच्या घराबाहेरचा आहे.
मिर्झापूर जिल्ह्यातील चिल्ह पोलीस स्टेशन हद्दीतील तिलाठी गावात उमेश कुमार दुबे यांचे घर आहे. दुबे यांना कुत्र्याची आवड असल्याने त्यांनी आपल्या घरी एक कुत्री पाळली आहे. घरातील लोक तिला ज्युली नावाने हाक मारतात.
#UttarPradesh#Mirzapur#dogsnake fight पालतू डॉग ने बचाई घरवालों की जान, सांप को पटक पटककर मारा. pic.twitter.com/1gwt4Hffdv
— Sweta Gupta (@swetaguptag) November 5, 2022
कुत्रा आणि साप यांच्यात कडवी झुंज
ज्युली इतकी निष्ठावान आहे की, ती घराच्या आसपास कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा भटक्या प्राण्याला फिरकू देत नाही. उमेश कुमार यांनी सांगितले की, एक दिवस ज्युली घराबाहेर होती आणि घरातील सर्व सदस्य घरात होते.
अचानक ज्युलीचा मोठा आवाज ऐकू आला. घरातील लोकांनी बाहेर पाहिले असता, ज्युली एका विषारी सापाशी लढत होती. ज्युली आणि सापामध्ये एक तासाहून अधिक वेळ झुंज सुरु होती. अखेर ज्युलीने सापाचा फडशा पाडलाच.
हा विषारी जातीचा साप असल्याचे उमेश कुमार यांनी सांगितले. सापाची लांबी सुमारे सात ते आठ फूट होती. साप घराच्या आत जात असल्याचे पाहून ज्युलीने सापाशी झटापट करून त्याला मारले.
पाच-सहा दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. साप आणि ज्युलीचा हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करण्यात आला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.