माझ्याच कमाईचं खाऊन माझ्यावरच अधिकार गाजवतो… महिलेने भररस्त्यात नवऱ्याला कुट कुट कुटलं; VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक मजेशीर प्रतिक्रीया येत आहेत. अनेक लोकांनी या व्हिडीओतील महिलेविरोधात नाराजगी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर दररोज एक व्हिडीओ व्हायरल होत असतो.अशा व्हिडीओने सर्वांचे मनोरंजन होत असते. अनेकदा दिल्लीच्या मेट्रोमधील मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातून अनेकदा मनोरंजन होत असते. कधी जागेवरुन मारामारी तर कधी प्रेमी जोडप्यांचे प्रेमकुजन तर कधी कोणाच्या तंग कपड्यांवर आक्षेप तर कधी भर गाडीत केलेले उत्तान नृत्य अशा प्रकारचे व्हिडीओ खूपच व्हायरल होत असतात. मागे लॉकडाऊनमध्ये एका फेरीवाल्यांची देमार हाणामारी जामच व्हायरल झाली होती.आता असाच एक नवरा बायकोच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ एका पत्नीने नवरोबाच्या जाहीरपणे केलेल्या धुलाईचा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळालेले नाही मात्र तो युपीच्या बहराईच येथील आहे.यात एक महिला भर रस्त्यात आपल्या पतीचे टीशर्ट पकडून त्याच्यावर हात साफ करीत आहे.त्यावर नवरा त्या महिलेला चल पोलिस ठाण्यात जाऊया अशी गयावया करत बोलताना दिसत आहे. त्यावर ती महिला आणखीनच क्रोधित होत मी का जाऊ पोलिस ठाण्यात माझी कमाई खातोस वर माझ्यावरच हुकूम चालवितोस ? असे बोलत त्या महिलेने त्याच्या जे काही श्रीमुखात भडकावली की पाहणारे देखील सर्द झाले असतील.या व्हिडीओत ती महिला शेजारपाजरच्यांनी जरा व्हिडीओ रेकॉर्ड करा याचा. दोघांचे भांडण नेमके कोणत्या गोष्टीवरुन सुरु आहे हे या व्हिडीओतून अजिबाद कळत नाहीए…मात्र नवरोबा दणकून मार खाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने नवऱ्याबद्दल सहानुभूती व्यक्त होत आहे.
येथे पाहा व्हायरल व्हिडीओ –
Kalesh b/w Husband and Wife (The wife beats up her husband in crowded market) Bahraich UP pic.twitter.com/vuCrwJvik8
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 28, 2024
एका युजरने या व्हिडीओवर पोस्ट करताना म्हटले की मी हैरान आहे, जर ही महिला याला पब्लिकली एवढे मारत आहे. तर बंद घरात किती मारत असेल.? तर अन्य युजरने म्हटले आहे की अशा नात्यात रहाण्यापेक्षा तुम्ही लग्नाच्या भानगडीत न पडलेलेच बरे ! काही युजरने म्हटले आहे की, या जागी जर उलट परिस्थिती असती. जर नवरा बायकोला मारत असता तर लोकांनी नवऱ्याची चांगलीच चंपी केली असती. आणि म्हणतात की महिला सुरक्षित नाहीत ! काही लोकांनी तर या व्हिडीओला कमेंट देताना लग्न म्हणजेच एक एक दहशत आहे. तर अन्य एका युजरने ही महिला पत्नी बनण्याच्या लायकीची नाही असे थेट कमेंट केली आहे. तर काही म्हटलेय या महिलेच्या पतीने नक्कीच काहीतरी मोठी चूक केली असणार नाही तर महिला इतकी भडकली नसती. एप्रिल महिन्यात देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. फॅसमवली कोर्टाच्या बाहेर पती आणि पत्नीची जबरदस्त भांडणे त्यात होती. महिलेने नवऱ्याची अगदी चपलाने धुलाई केली होती, अखेर पोलिस आणि वकील या दोघांच्या मदतीला धावल्याने नवऱ्याची सुटका झाली होती.