VIDEO : कारच्या बोनेटवर बसून महिलेची जीवघेणी स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडून कारवाई सुरु
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेत कारवाई सुरू केली. स्कॉर्पिओ चालवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.
चालत्या वाहनांवर स्टंटबाजी करण्याची प्रटंड क्रेझ आजकाल तरुणांमध्ये वाढली आहे. काही लोक इतके जीवघेणे स्टंट करतात की पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला चालत्या कारच्या बोनेटवर बसून जीवघेणा स्टंट करत आहे. महिलेचा हा स्वॅग पाहून लोकही थक्क झाले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाईला सुरवात केली आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रस्स्त्यावर अनेक वाहने उभी असलेली दिसत आहेत. इतक्यात एक स्कॉर्पिओ गाडी धावत येते. या गाडीच्या बोनेटवर एक महिला आरामात बसून स्टंट करत आहेत.
नोएडा की सड़कों पर कार सवार युवती स्टंट करती हुई नजर आई ,कार के बोनट पर सवार युवती अपनी जान के साथ खेलते हुए नजर आई, नोएडा पुलिस से कारवाई की अपेक्षा। @noidapolice @Uppolice pic.twitter.com/ERlxYtpZ2p
— Ramesh Parihar (@RameshP28926948) November 9, 2022
व्हिडिओ पाहून हे दृश्य रात्रीचे असल्याचे कळते. स्कॉर्पिओ गाडी हळूहळू चालत आहे. महिलेची ही स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
हा धक्कादायक व्हिडिओ नोएडाच्या सेक्टर 113 मधील असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेत कारवाई सुरू केली. स्कॉर्पिओ चालवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.
बोनेटवर बसलेली तरुणी पेशाने इंजिनियर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.