VIDEO : फॉरेनची पाटलीन शेतात करतेय कांदा लागवड, सासूने दिली भन्नाट प्रतिक्रिया
सध्या एका फॉरेनच्या पाटलीनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही परदेशी सून भारतात शेतात काम करताना दिसत आहे.
प्रेमाला मर्यादा नसतात. प्रेम कधी, कुणावर जडेल हे सांगू शकत नाही. भारतीय मुलांमध्ये परदेशी शिक्षण किंवा नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परदेशी मुलींशी प्रेम विवाह होत आहेत. भारतीय संस्कृतीची क्रेझ जगभरात आहे. यामुळे भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडलेल्या परदेशी मुली भारतीय मुलांना जोडीदाराच्या रुपात पसंती देताना दिसत आहेत. तसे पाहता, भारतीय लोक परदेशी मुलींशी लग्न करून परदेशात स्थायिक होत असल्याचे सामान्यतः दिसून येते. परदेशी मुली पतीसोबत रहायला भारतात आल्याचे क्वचितच पाहायला मिळते. सध्या एका फॉरेनच्या पाटलीनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही परदेशी सून भारतात शेतात काम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही परदेशी सून हिंदीही सहज बोलत आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये ही परदेशी सून देशी स्टाईलमध्ये शेतात कांदा पेरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या परदेशी महिलेने भारतीय कपडे घातले आहेत आणि भांगात सिंदूरही लावला आहे. ती शेतात आरामात बसून कांद्याची पेरणी करत आहे.
View this post on Instagram
पत्नीला शेतात काम करत असल्याचे पाहून तिचा नवरा येतो आणि तिला ‘तुला काही विचारू का’ म्हणतो, ज्याच्या उत्तरात ती हिंदीत ‘हो नक्की’ म्हणते. मग नवरा तिला विचारतो ‘तू कुठली आहेस’, तर ती म्हणते ‘मी जर्मनीची आहे’ आणि इथे शेतात कांदे लावत आहे.
मग नवऱ्याने थट्टा करत तिला सांगितले की, ‘तू सातासमुद्रापार जर्मनीहून भारतात कांदा लावायला आली आहेस’, तेव्हा बायकोही आनंदाने ‘हो’ म्हणते. त्याचवेळी, ती असेही म्हणते की तिला मजा येत आहे, खूप छान वाटत आहे. यादरम्यान दूर उभी असलेली परदेशी सुनेची सासूही हसताना दिसते.
व्हिडिओला 15 लाखांहून अधिक लाईक्स
हा व्हिडिओ लोकांच्या मनाला खूप भावला आहे. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 19 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, 15 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.