Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियातून आलेली कारभारीन शेताचा ताबा घेते तेव्हा…

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या कर्टनी नामक महिलेने भारतीय वंशाच्या हरियाणातील तरुणाशी विवाह केला. त्यानंतर ती आपला पती लवलीनसोबत हरियाणात आली.

ऑस्ट्रेलियातून आलेली कारभारीन शेताचा ताबा घेते तेव्हा...
ऑस्ट्रेलियन तरुणी भारतात करतेय शेतावर कामImage Credit source: Zee News
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 6:09 PM

भारतीय संस्कृतीची (Indian Culture) भुरळ जगभरात सर्वांनाच आहे. याचमुळे परदेशी मुलींनी भारतीय मुलांशी लग्न करण्याचे (NRI Girl Married with Indian Youth) प्रमाण वाढले आहे. भारतीय मुलांशी लग्न करुन भारतात सेटल होण्यासाठीही परदेशी मुली फार उत्सुक दिसतात. भारतात आल्यानंतर इथली संस्कृती, रितीरिवाज, परंपरा जपण्यास त्यांना फार आवडते. अशीच एक ऑस्ट्रेलियातून आलेली कारभारीन भारतात येऊन चक्क शेताच्या बांधावर काम (Australian Bride Work in Farm) करताना दिसली.

ऑस्ट्रेलियन महिलेचा हरियाणातील तरुणाशी विवाह

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या कर्टनी नामक महिलेने भारतीय वंशाच्या हरियाणातील तरुणाशी विवाह केला. त्यानंतर ती आपला पती लवलीनसोबत हरियाणात आली. कर्टनी लवलीनसोबत शेतावरुन गवताचं ओझं उचलून घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

कर्टनीचा व्हिडिओ पतीने इन्स्टाग्रामवर केला शेअर

कर्टनीचा शेतातून डोक्यावर गवताचं ओझं घेऊन जातानाचा व्हिडिओ तिचा पती लवलीन वत्स याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मेरा भाग्य मिल गया’.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की कर्टनी आपल्या पतीसोबत शेतावर गेली आहे. शेतावर पतीसोबत फिरताना कर्टनी अतिशय आनंदी दिसत आहे. हसतमुखाने कर्टनी शेतावर फिरण्याचा, मोकळ्या वातावरणाचा आनंद घेत आहे.

शेतावर फिरुन झाल्यानंतर गवताचं ओझं डोक्यावर घेतलं

व्हिडिओमध्ये एका कपड्यात शेतातील कापलेला चारा बांधलेला दिसत आहे. शेतावर फिरुन झाल्यानंतर कर्टनी हे गवताचं ओझं डोक्यावर उचलून शेतातून चालताना दिसत आहे. पती लवलीनने हा भारा डोक्यावर ठेवण्यासाठी कर्टनीला मदत करत आहे.

व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स

या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच कमेंटमध्ये या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.