धावत्या ट्रेनमध्ये लोकांनी केले असे काही की व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल हैराण
मुंबईची लोकल असो कि दिल्लीची मेट्रो प्रवासी प्रवास करताना अंतरंगी व्हिडीओ करून पोस्ट करीत असतात. अर्थात यात दिल्ली मेट्रोवाले सर्वात पुढे आहेत. मुंबईत लोकलमध्ये इतकी गर्दी असते की असा मोकळंपणा मिळत नाही. परंतू आता व्हायरल झालेला व्हिडीओ सर्वांवर कडी करणारा आहे.
न्यूयॉर्क | 24 नोव्हेंबर 2023 : मुंबई लोकल ट्रेनमध्ये लोकांना तुम्ही वेगवेगळे व्हिडीओ बनवून समाजमाध्यमावर ते व्हिडीओ शेअर करताना पाहिले असेल, मुंबई लोकलच्या दिल्ली मेट्रोतील गमती जमती भयानकच असतात. आता अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एका ट्रेनमधील व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही प्रचंड हैराण व्हाल. मेट्रोमध्ये आपण प्रवास करीत असल्याने आणि ती सार्वजनिक जागा असल्याने सर्वांनी नियम पाळावे लागतात. परंतू तरीही प्रवासी काही ना काही खटपटी करीत असतात. आता समाजमाध्यमावर व्हायरल झालेला न्यूयॉर्कच्या मेट्रोचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मिडीयावर 23 नोव्हेंबर 2023 रोजीचा न्यूयॉर्क सबवेचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला 24 तासांत 6.5 दशलक्ष लोकांनी पाहीले आहे. पाच हजार लोकांनी या व्हिडीओला रिपोस्ट केले आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की ट्रेनच्या एका टेबलावर खूप सारे अन्नपदार्थ सर्व्ह केलेले दिसत आहेत, आणि प्रवासी आनंदाने त्या पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून ही ट्रेन नाही तर एखादे रेस्टॉरंट असून लोक पार्टी करण्यासाठी येथे आले आहेत असे वाटते.
येथे पाहा व्हिडीओ –
wtf is going on in nyc 😭😭 pic.twitter.com/M4q54zCSW6
— kira 👾 (@kirawontmiss) November 23, 2023
व्हिडीओवर आली युजरची प्रतिक्रीया
या व्हिडीओला सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्स ( आधी ट्वीटर ) @kirawontmiss नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. या पोस्टला कॅप्शन लिहीताना – न्यूयॉर्कमध्ये हे काय चाललंय ! असा समर्पक उल्लेख व्हिडीओचा केला आहे. या व्हिडीओला पाहून युजर्सने विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहीलेय की जगात न्यूयॉर्कच असे शहर आहे, जेथे असं काही होऊ शकतं. दुसऱ्या एका युजरने म्हटलंय की मी माझ्या जीवनात पाहिलेली सर्वात अबज गोष्ट आहे. तर अन्य एका युजरने म्हटलेय की हे सर्व काय चालू आहे ?