मुंबई | 22 ऑक्टोबर 2023 : सध्या नवरात्री उत्सवाने सर्वत्र गरबा आणि दांडीयाचा माहौल आहे. त्यात मुंबईची लाईफ लाईन उपनगरीय लोकल ट्रेन तरी यातून कशी काय ? वाचणार. मुंबईकरांच्या प्रत्येक सुखदु:खात साथ देणाऱ्या लोकल ट्रेनच्या ( Mumbai Local Train ) डब्यातही गरबा सुरु असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या गरब्यामुळे दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रीया आलेल्या आहेत. काहींनी यास पाठिंबा दिला आहे. तर काहींनी इतर प्रवाशांना त्रास कशाला असे म्हटले आहे.
लोकलमधील गरबा खेळत असल्याचा एक व्हिडीओ मुंबई हेरिटेज नावाच्या एक्स हॅंडलवरुन ( आधीचे ट्वीटर ) शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला पोस्ट करताना, ‘मुंबई लोकल में गरबा’ अशी कॅप्शन दिली आहे. या क्लिपमध्ये काही प्रवासी गरबा गीत म्हणून नाचताना दिसत आहेत. तर काही प्रवासी टाळ्या वाजवित ताल धरीत त्यांना प्रोत्साहन देत आहेत. तर काही प्रवासी गप्प बसून त्यांचा डान्स पाहात आहेत. या पोस्टला 18 ऑक्टोबर रोजी एक्सवर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टला 81 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या पोस्टला 636 लोकांनी लाईक्स केले आहे. तर 121 लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
Garba in Mumbai Local pic.twitter.com/Xd4MtiQsGu
— Mumbai Heritage (@mumbaiheritage) October 18, 2023
लोकल ट्रेनमधील गरबा नृत्य पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने यांच्यातील बॉंडींग पाहून चांगले वाटत आहे असे लिहीले. तर एका युजरने खुप सुंदर आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या युजरने हे दृश्य खूपच चांगले आहे असे म्हटले आहे. तर अन्य काही युजर नाराज झाले आहेत. अशा प्रकारे सार्वजनिक वाहनात इतर प्रवाशांना याचा त्रास होऊ शकतो असे म्हटले आहे. काहींनी रेल्वेला टॅग करीत तक्रारही केली आहे.