Marathi News Trending A woman was seen sweeping the street with her baby on her back, people watching the video said Nari Tu Narayani
Viral Video : पाठीवर मुलं; रस्ता झाडताना दिसली महिला, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले- ‘नारी तू नारायणी’
एएनआयने ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्या आहेत. महिलेच्या या भावनेला लोकांनी सलाम केला आहे. आणि म्हटलं आहे की, आई ही आईच असते.
नवी दिल्ली : आई, हा फक्त एक शब्द नाही तर संपूर्ण जग आहे. आई (Mother) आपल्याला जन्म देते, वाढवते आणि प्रत्येक सुख-दुःखात साथ देते, म्हणूनच आईला जीवनदायीनी असेही म्हणतात. तसे, या संपूर्ण विश्वात आईपेक्षा मोठे दुसरे कोणी नाही. स्वतः देव देखील यावर विश्वास ठेवतात. भगवान राम आणि भगवान कृष्ण हे देखील भगवान विष्णूचे अवतार होते, परंतु त्यांनी पृथ्वीवर जन्म देणारी आणि त्यांचे पालनपोषण करणाऱ्या आईला स्वतःहून मोठे मानले. त्यांच्यासाठी त्यांची आई हे सारे जग होते. आईशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ (videos) सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका आईची अथक धडपड पाहून लोक थक्क झाले आहेत आणि ‘नारी तू ही नारायणी है’ असं म्हणत आहेत.
#WATCH | Odisha: A lady sweeper, Laxmi cleans the road in Mayurbhanj district with her baby tied to her back. pic.twitter.com/g7rs3YMlFn
वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक महिला रस्ता झाडताना दिसत आहे आणि यादरम्यान तिने तिच्या लहान मुलाला पाठीवर बांधले आहे. लक्ष्मी मुखी असे या महिलेचे नाव सांगितले जात आहे. ती मूळची ओडिशाची असून गेली 10 वर्षे बारीपाडा नगरपालिकेत झाडलोटचे काम करते. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सांगितले की, ती तिच्या घरात एकटीच असते. त्यामुळे तिला तिच्या मुलाला पाठीवर बांधून काम करावे लागते. ही तिच्यासाठी अडचण नसून हे तिचे कर्तव्य आहे, असे महिलेचे म्हणणे आहे. त्याचवेळी बारीपाडा नगरपालिकेचे अध्यक्ष बादल मोहंती यांनी सांगितले की, ‘लक्ष्मी मुखी आमच्या येथील सफाई कर्मचारी आहेत. काही वैयक्तिक समस्यांमुळे, ती तिच्या मुलाला तिच्यासोबत आणते आणि दररोज तिचे कर्तव्य पार पाडते. मी माझ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या गरजांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, काही अडचण आल्यास आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.
व्हिडिओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला
एएनआयने ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्या आहेत. महिलेच्या या भावनेला लोकांनी सलाम केला आहे. आणि म्हटलं आहे की, आई ही आईच असते.