Video | वर्ल्ड रेकॉर्डसाठी तो लोकांच्या डोक्यावर सटासट नारळ फोडू लागला, पाहणारेही घाबरले
विश्व विक्रम करण्यासाठी लोक काही तरी अचाट पराक्रम करीत असतात. असाच एक विक्रम एका व्यक्तीने केला आहे. त्याने 1 मिनिटात डोक्यावरील 68 नारळ फोडले आहेत. परंतू त्याच्यापेक्षा ज्यांनी डोक्यावर नारळ ठेवले त्यांचे जास्त कौतूक वाटत आहे.
मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : आपले नाव जगात होण्यासाठी लोक नवनवे विक्रम करीत असतात. काही जण एखादी वस्तूची सर्वात छोटी प्रतिकृती बनवितात. तर काही जण सर्वात जास्त नखे वाढवून किंवा नखे वाढवून विक्रम करतात, तर काही जण नाकाने वेगाने टायपिंग करतात. अलिकडे एका व्यक्तीने लोकांच्या डोक्यावर नारळ ठेवून ते नानचाकूने फोडण्याच्या केलेल्या विक्रमाचा थराथर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जर फोडणाऱ्याचा अंदाज चुकला तर नारळा ऐवजी व्यक्तीची कवटी फुटण्याचा धोका असलेला हा व्हिडीओ पाहून थरकाप उडत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की कराटे पटू असलेली व्यक्ती हातातील नानचाकूने खाली डोक्यावर नारळ घेऊन बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरील नारळ एकामागोमाग वार करीत फोडत आहे. या व्यक्तीच्या अंदाजाने नारळ वरच्या वर आरामात फुटत आहेत. परंतू हा व्हिडीओ पाहाताना पाहणाऱ्यांच्या जीवाचा मात्र थरकाप उडत आहे. नारळ डोक्यावर ठेवलेल्या व्यक्ती आरामात एक नारळ फुटल्यानंतर दुसरा नारळ डोक्यावर ठेवत आपले डोके त्या व्यक्तीच्या ताब्यात देत आहेत. या व्यक्तीने लागोपाठ सर्व नारळ फोडून हा विश्वविक्रम अखेर कायम केला आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
KV Saidalavi looks to break his own record on the set of Lo Show Dei Record in Italy, and not the skulls of these volunteers 😳 pic.twitter.com/26aN5XRh6K
— Guinness World Records (@GWR) October 13, 2023
ट्वीटरवर शेअर झालेल्या या व्हिडीओला कॅप्शन दिली आहे. त्यात लिहीली आहे की, ‘के.व्ही. सैदालवी वाटतंय आपला स्वत:चा रेकॉर्ड तोडतील…डोक्यावरील नारळ फोडण्याचा आणि लोकांचे डोके न फोडण्याचा !’ सैदालवी यांनी यापूर्वी 42 नारळ फोडण्याचा विक्रम केला होता. 4 फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी हा विक्रम केला होता. आता त्यांनी 68 नारळ फोडून आपलाच विक्रम तोडला असून नवा विक्रम केला आहे. सोशल मिडीयावर लोक त्यांचे कौतूक करीत आहेत.