zomato ला तरूणाने चौदावेळा विचारले भांगेची गोळी आहे का ? पोलीसांनी मग चांगलेच समजावले
होळीचा देशभर साजरी झाली असली तरी दिल्लीच्या एका पट्टयाने ऑनलाईन फूड मागविताना चक्क भांगेची ऑर्डर केल्याने समाजमाध्यमावर काल धुळवडच साजरी झाली.
नवी दिल्ली : होळी आणि धुळवड काल देशभर साजरी करण्यात आली. लोकांनी कोरोनानंतर मिळालेल्या मुक्त निर्बंध वातावरणाचा पुरेपुर फायदा उठवत होळीचा खरा आनंद लुटला. अनेकांनी स्वादीष्ट अन्नपदार्थांवर चांगलाच आडवा हात मारत आनंद द्विगुणित केला, असाच आवडते अन्नपदार्थ मिनिटात घरपोच करणाऱ्या ऑनलाईन फूड डीलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवर एका पट्ट्याने चक्क भांगेची ऑर्डर केली आणि समाजमाध्यमावर त्याची अनेकांनी फिरकी घेतली. शेवटी मग दिल्ली पोलीसांनी या फिरकीत सामील होत त्या तरूणाला चांगलेच समजावले.
झोमॅटो या ऑनलाईन फूड मागविणाऱ्या एपवर एका पट्ट्याने काल चक्क भांगेची ऑर्डर केली. एकवेळ दोन वेळ नाही तर चौदावेळा त्याने ही मागणी केली, त्यामुळे झोमॅटोवाले या ग्राहकाच्या विचित्र मागणीमुळे अक्षरश: विटले आणि त्यांनी आयडीया केली. त्यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवर या तरूणाचे नाव जाहीर करीत आम्ही काय भांगेची गोळीबिळी पुरवत नाही बाबा असे समाजमाध्यमावर स्पष्ठ केले. त्यानंतर या शुभम नावाच्या युजरला इतक्या मजेशीर प्रतिक्रीया आल्या की त्या वाचून सर्वाचीच होळी आणखीन मजेत गेली, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी तर त्याउपर कडी केली.
झोमॅटोवर चक्क भांगेच्या गोळ्यांची ऑर्डर केली
देशाची राजधानी दिल्ली जवळील गुरूग्राम मधून एका शुभम नावाच्या तरूणाने काल होळीसाजरी करण्यासाठी ऑनलाईन फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवर चक्क भांगेच्या गोळ्यांची ऑर्डर केली. या अचानक आलेल्या मागणीने झोमॅटो वालेही चांगलेच चक्रावले. सुरूवातीला झोमॅटोवाल्यानी त्यास मनावर घेतले नाही. परंतू हा पट्टा काय मानायला तयार नाही त्याने आपला हेका कायमच ठेवत भांग मागण्याचे आपले प्रयत्न जारीच ठेवले. अखेर 14 वेळा अशी मागणी आल्यानंतर झोमॅटोवाल्यांनी आयडीया केली. झोमॅटोवाल्यांनी ‘कोणीतरी गुरूग्रामच्या शुभमला समजवा की ‘भांग की गोली’ ची डीलिव्हरी आम्ही करीत नाही. त्याने चौदावेळा मागणी केली आहे.’ असे ट्वीट केले. त्यानंतर या युझरला अशा भन्नाट प्रतिक्रिया आल्या की वाचून सर्वांचे मनोरंजन झाले.
If anyone meets Shubham…. tell him not to drive if he consumes Bhaang. https://t.co/r94hxt5jeL
— Delhi Police (@DelhiPolice) March 7, 2023
लोकांनी अशा प्रतिक्रीया दिल्या
इंटरनेटवर ही झोमॅटोची पोस्ट व्हायरल झाल्यावर अनेकांनी वेगवेगळ्या पोस्ट करीत शुभमची फिरकी घेतली. एकाने युजरने पोस्ट केली ‘जर भांगेची व्यवस्था होत नसेल तर कमीतकमी होळीसाठी पकोडे भजी तरी पुरवा !’ एकाने म्हटले की ‘भांग खाऊनच ऑर्डर केली आहे वाटते, कारण चौदावेळा मागणी केली आहे!’ अन्य एका युजरने म्हटले की , ‘शुभम भाई इस बार शराब से काम चला लो’ त्यानंतर सर्वात कडी दिल्ली पोलिसांनी केली. दिल्ली पोलीसांनी झोमॅटोचे ट्वीट टॅग करीत रिट्वीट करीत त्यावर म्हटले की, ‘जर तुम्हाला शुभम कुठे दिसला तर त्याला सांगा त्याने जर भांग पिली असेल तर गाडी चालवू नको !’