काम कसं टाळायचं हे फक्त माणसांनाच माहित असतं. कुठलं काम लागलं की आपण लगेच बहाणे शोधतो. घरी आईने काही काम सांगितलं की झोपेचं (Sleeping) नाटक करतो. झोप एक चांगली पळवाट असते. माणूस हे करतो, करू शकतो, मान्य! पण प्राणी? प्राणी सुद्धा काम सांगितल्यावर पळवाट (Escape) शोधू शकतात का? इमॅजिन करा की तुमचा पाळीव प्राणी त्याला एखादं काम सांगितल्यावर बहाणे काढत असेल आणि तुम्हाला त्याचं असं वागणं समजून येत असेल… वाह! क्युट इजंट इट? अभिनेता आणि लेखक जिम रोझ सर्कसने ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये शुगर नावाची घोडी गवतावर पडली आहे आणि ती झोपल्याचं नाटक करतीये. काम टाळण्याचं निमित्त फक्त माणसांनाच मिळू शकतं असं वाटत असेल तर पुन्हा एकदा विचार करा. इंटरनेटवर या शुगरचा फोटो वायरल (Photo Viral) होत आहे ज्या फोटोत काम करावंसं वाटत नाही म्हणून ती झोपेचं नाटक करत आहे.
कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, “शुगरला भेटा. तिला काम करायचं नाहीये. तिला जर कुणी घोडेस्वारीसाठी विचारलं तर कंटाळा करेल आणि आडवी होऊन झोपायचं नाटक करेल. जोपर्यंत काम सांगणारा माणूस, रायडर तिथून निघून जात नाही तोपर्यंत ती डोळे देखील उघडणार नाही.” हा फोटो शेअर झाल्यानंतर इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल झाला. आतापर्यंत त्याला 476 हजार लाईक्स आणि 41 हजार रिट्वीट मिळाले आहेत.
Meet Sugar, she doesn’t like to be ridden. If Sugar is approached with a saddle she lyes down and pretends to be asleep. Sugar refuses to open her eyes until the riders leave. pic.twitter.com/FWaKYoKlHx
— jim rose circus (@jimrosecircus1) June 12, 2022
एका यूजरने लिहिले, ‘शुगर हा माझा स्पिरीट ऍनिमल आहे. आणखी एका युझरने लिहिले, “खरं सांगायचं तर मी या घोड्यासारखा आहे.” तिसऱ्या युझरने लिहिलं, “स्मार्ट हॉर्स. मला आशा आहे की ही आयडिया माझ्या ऑफिसमध्ये जाईल. मलाही गाडी चालवू नये असं वाटत आहे.”
मात्र, एका वैतागलेल्या युजरने शुगर मेली असावी, अशी भीतीही व्यक्त केली. त्याने लिहिले, “अरे देवा, मला असं वाटतं की शुगरने उठावं कारण खाली झोपणे घोड्यांसाठी चांगले नाही. मी कधीही घोडे झोपलेले पाहिले नाहीत. मला वाटत होतं की, जोपर्यंत ते खरंच मरत नाहीत तोपर्यंत ते असं करणार नाहीत.”
मात्र, काही अश्वप्रेमींनीही या चित्रावर आपल्या कमेंट्स दिल्या आहेत. त्याने लिहिले आहे की घोडेही झोपायच्या वेळी आडवे होऊन झोपतात. त्याचबरोबर न्यूयॉर्क पोस्टने प्राण्यांच्या वर्तन तज्ज्ञ डॉ. सुजान हेझल यांचा हवाला देत म्हटले आहे की, अति झोपेच्या वेळी या प्रजातींमध्ये हे वर्तन सामान्य आहे.