Shama Sikander : टीव्ही आणि बॉलीवुड अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. शमा आपल्या चाहत्यांसाठी सतत तिच्या इन्स्टाग्रामवर हटके व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती सतत आपल्या चाहत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते. शमाच्या नवनवीन फोटोंची चाहते वाट पाहत असतात. तिच्या हॉट फोटोंवरून चाहत्यांची नजर हटता हटत नाही. शमाच्या हॉट फोटोंची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असते.
व्हायरल व्हिडीओ :
शमा सिकंदर ही सतत तिच्या नवनवीन लूकमधील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधत असते. सध्या तिचा पिवळ्या रंगाच्या साडीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती समुद्राच्या अगदी शेजारी असलेल्या हॉटेलच्या स्विमिंग पूलच्या किनारी उभं राहून, ती टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर डान्स करत आहे.
शमा सिकंदरच्या पिवळ्या साडीतील डान्सने कैटरीना कैफच्या डान्सला टक्कर दिली आहे. तिच्या या व्हिडीओने इंटरनेटचा पारा वाढला आहे.अभिनेत्री शमा सिकंदरचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत.
तिच्या या व्हिडीओला चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. तिने हा व्हिडीओ शेअर करताना ‘परफेक्ट गाण्यासाठी परफेक्ट मौसम’ असं कप्शन दिलं आहे.