सफाई ‘अशी’ काही केली, की नगरसेवकाला नायक सिनेमाप्रमाणं घातली दुधानं अंघोळ, Video viral
आम आदमी पार्टीचे नगरसेवक हसीब अल हसन (Hasib Al Hassan) यांना बॉलिवूड चित्रपट 'नायक'मधील (Nayak) अनिल कपूरच्या व्यक्तिरेखेची आठवण होईल, असे काही करत असताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे.
दिल्लीतील एमसीडी (Municipal Corporation of Delhi) निवडणुकीबाबत सुरू असलेल्या राजकीय भांडणाच्या दरम्यान एक अतिशय मनोरंजक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये आम आदमी पार्टीचे (आप) नगरसेवक हसीब अल हसन (Hasib Al Hassan) यांना बॉलिवूड चित्रपट ‘नायक’मधील (Nayak) अनिल कपूरच्या व्यक्तिरेखेची आठवण होईल, असे काही करत असताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. नगरसेवक हसन हे त्यांच्या भागाच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांना नाल्यात कचऱ्याचा ढीग दिसला. त्यामुळे त्यांना इतका राग आला, की त्यांनी ते साफ करण्यासाठी त्यात उडी घेतली. यानंतर लोकांनी त्यांना दुधाने अंघोळ घातली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नालेसफाई करून नगरसेवक बाहेर येतात तेव्हा लोक त्यांचा जयजयकार करतात.
नगरसेवकाचे कौतुक
लोकांनी या कामाबद्दल नगरसेवकाचे कौतुक तर केलेच, पण नायकाच्या चित्रपटाप्रमाणे त्यांच्या अंगावर लागलेली घाण साफ करण्यासाठी त्यांना दुधाने अंघोळही घातली. व्हिडिओमध्ये तुम्ही दिसेल, की नगरसेवक हसीब नाला साफ करून बाहेर येताच लोकांनी त्यांना खुर्चीवर बसवले. नंतर त्यांना दुधाने अंघोळ घालावी. जीवनात असे दृश्य तुम्ही क्वचितच पाहिले असेल. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी नगरसेवकाची मजा लुटण्यास सुरुवात केली आहे. काहींनी मीम्स शेअर केले आहेत.
Drama peaks as #MCDElections2022 come closer, #AAP corporator turns Anil Kapoor from Bollywood movie Nayak.
AAP corporator Hasib Al Hassan Jumps into a drain in East Delhi to clean it, takes a milk bath later. ?? pic.twitter.com/COU0F09pDD
— ˥¡HOW ∀ᴚʇOH˥∀W?? मोहिल मल्होत्रा?? (@TRULYMM8) March 22, 2022
दिल्लीत राजकीय संघर्ष
एमसीडी निवडणुकीच्या तारखांवरून दिल्लीत राजकीय संघर्ष सुरू आहे. आम आदमी पार्टीने (आप) केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. निवडणूक पुढे ढकलण्यात येऊ नये आणि वेळेवर व्हावी, असे ‘आप’ने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. वास्तविक, राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी एमसीडी निवडणुकांच्या तारखांची घोषणा पुढे टाळली होती. यामागची कारणमीमांसा देताना केंद्र सरकारने असे काही मुद्दे उपस्थित केले आहेत, ज्यांची कायदेशीर चौकशी होणे बाकी आहे.