Video : आता तर हद्द झाली! Kacha Badamनंतर आणखी एक गाणं सोशल मीडियावर Viral

Kala Angoor : 'काचा बदाम' गाण्यानंतर आता 'काला अंगूर' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडिओ (Video) समोर आल्यानंतर लोक त्याला प्रचंड पसंती देत ​​आहेत. त्याचवेळी काही लोक म्हणत आहेत, की आता तर हद्द झाली.

Video : आता तर हद्द झाली! Kacha Badamनंतर आणखी एक गाणं सोशल मीडियावर Viral
कच्चा बदामनंतर काला अंगूर गाणं व्हायरलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 10:26 AM

Kala Angoor :कच्चा बदाम‘ गाण्यानंतर आता ‘काला अंगूर’ या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकतेच एक काका ‘कच्चा अमरूद’ हे गाणे गाताना सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्याच काकांनी ‘काला अंगूर’ आणले आहे. काका रस्त्यावर फिरतात आणि गाणी गाताना फळे विकतात. नुकतेच जेव्हा त्यांचे ‘कच्चा अमरूद’ हे गाणे व्हायरल झाले तेव्हा एक वेगळाच उत्साह दिसून आला होता. आता तेच गाडीवर बसून ‘काला अंगूर’ विकताना आणि त्यावर गाणी (Song) म्हणताना दिसत आहेत. सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडिओ (Video) समोर आल्यानंतर लोक त्याला प्रचंड पसंती देत ​​आहेत. त्याचवेळी काही लोक म्हणत आहेत, की आता तर हद्द झाली. इंटरनेटवर काहीही व्हायरल होत असल्याचे लोक म्हणत आहेत. काला अंगूर हे गाणे ऐकून सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

यूझर्सना लावले वेड

ज्या पद्धतीने व्हायरल व्हिडिओ पाहिला जात आहे, ते पाहून लोक म्हणत आहेत, की ज्या पद्धतीने ‘कच्चा बदाम’ आणि ‘कच्चा अमरूद’ या गाण्यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला, आता ‘काला अंगूर’देखील त्याच मार्गावर आहे. त्यामुळे सोशल मीडिया यूझर्सना त्याचे वेड लागले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हातगाडीवर बसलेले ‘चाचा’ चहाचे घोट घेत ‘काला अंगूर’ गाताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहून अनेकांना हसायलाही येत आहे. व्हिडिओ पाहा…

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. इन्स्टाग्रामवर saliminayat नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की पश्चिम बंगालमधील भुबन बद्याकर या शेंगदाणा विक्रेत्याने ‘कच्चा बदाम’ गाणे गाऊन इंटरनेटवर अधिराज्य गाजवले होते. ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर लाखो-करोडो रिल्स तयार झाल्या आहेत.

आणखी वाचा :

कुत्र्यानं असं काही पळवलं, की धाडकन् कारला जाऊन आदळला; Funny video viral

गर्दी, तरीही शिस्त; जपान मेट्रोचा ‘हा’ Video viral; यूझर्स म्हणतायत, म्हणूनच आहेत जगात सर्वात पुढे…

Video : आधी धूर, मग स्फोट..; Ola S1 Pro स्कूटरला भररस्त्यात लागली आग, तर चांगल्या दर्जाचं साहित्य वापरल्याचा कंपनीचा दावा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.