ओयो हॉटेलमध्ये अविवाहित कपल्सना बॅन, आता ‘या’ नव्या ऑप्शन्सची चर्चा

अविवाहित जोडप्यांना Oyo हॉटेल्समध्ये एन्ट्री बॅन केल्या नंतर आता काही नवीन ऑप्शन आले आहेत. सध्या या ऑप्शन्सची बरीच चर्चा होताना दिसत आहे. मुख्य म्हणजे हे ऑप्शन्स संपूर्ण भारतात सेवा देतात. त्यामुळे आता अविवाहित जोडप्यांमध्ये हे ऑप्शन्सची क्रेझ नक्कीच वाढेल असं दिसतंय.

ओयो हॉटेलमध्ये अविवाहित कपल्सना बॅन, आता 'या' नव्या ऑप्शन्सची चर्चा
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 6:12 PM

भारतामध्ये कोणत्याही शहरात कमी खर्चात अन् चांगल्या सोयी असलेल्या, चांगल्या दर्जाचे हॉटेल्स पाहायचे असतील तर Oyo कंपनी लोकप्रिय मानली जाते. त्याहीपेक्षा Oyo ची चर्चाही जास्त करून अविवाहित जोडप्यांसाठी म्हणजे कपल्ससाठी केली जाते.

अविवाहित जोडप्यांना Oyo हॉटेल्समध्ये एन्ट्री दिली जाणार नाही

चांगल्या दर्जाचे भारतात Oyo हॉटेल्सची सुरुवात 2013 मध्ये झाली होती. आजकाल Oyo हॉटेल्स लहान शहरांपासून ते मेट्रोपोलियन शहरांमध्ये पाहायला मिळतात. परंतु, आता Oyo या कंपनीनं त्यांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. यापुढे अविवाहित जोडप्यांना Oyo हॉटेल्समध्ये एन्ट्री दिली जाणार नाही.

आतापर्यंत अनेक अविवाहित जोडप्यांना पटकन रुम बुक करता येत होतं. मात्र आता नव्या नियमांमुळे या गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी कपल्ससाठी Oyo हा सर्वात चांगला पर्याय मानला जायचा.

नात्याचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक

पण नुकतेच Oyo ने त्यांच्या नियमावलीमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार ओयो हॉटेलमध्ये अविवाहित कपल्सना एन्ट्री बंद करण्यात आली आहे. Oyo कडून आता त्याच्या हॉटेल्समध्ये विवाहित जोडप्यांनाच रुम दिल्या जाणार आहे. पण त्यासाठी देखील कपल्सना त्यांच्या नात्याचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

त्यामुळे आता अविवाहित जोडप्यांसमोर भेटायचं कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ओयो हॉटेल नाही तर मग भेटण्यासाठी सुरक्षित आणि बजेटमध्ये असणारे ऑप्शन असणारच नाही का असा प्रश्न उपस्थित नक्कीच झाला असेल. पण ओयोसारखेच काही ऑप्शन आता उपलब्ध झाले आहेत, जिथं अविवाहित कपल्स भेटू शकतात, एकमेकांसोबत वेळ घालवू शकतात.

Oyo नंतर आता नव्या ऑप्शन्सची चर्चा 

ओयो हॉटेलने अविवाहित कपल्सना एन्ट्री बॅन केल्यानंतर आता कित्येक कपल्स एकमेकांना भेटण्यासाठी वेगळ्या जागेच्या शोधात असतील. तर, त्यांच्यासाठी हे काही ऑप्शन्स आहेत. ओयोसारखंच असलेलं एक प्लॅटफॉर्म जिथं अनमॅरिड कपल्स तासांवर रूम बुक करू शकतात. हा प्लॅटफॉर्म भारतातील 100 पेक्षा अधिक शहरांमध्ये सेवासुविधा देत आहे.

हे नवीन ऑप्शन म्हणजे एक अॅप आहे ज्याच्या मदतीने तुम्ही हॉटेल बुकिंग करू शकता. या अॅपचे नाव ‘अवरली रूम्स’ असून हे एक हॉटेल बुकिंग अॅप आहे जिथं तुम्हाला जितके तास रूम हवी आहे तितक्या तासांसाठी तुम्ही रूम बुक करू शकता. इथं तुम्हाला स्वस्तात हॉटेल रूम्स उपलब्ध होतात. सोबतच तुम्ही प्रीमियम हॉटेल रूमही घे. ऊ शकता. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास त्यांच्याशी संपर्क करू शकता.

या अ‍ॅपशिवाय तुम्ही गुगल हॉटेल किंवा ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीच्या मदतीनेही हॉटेल रूम बुक करू शकता. पण अर्थातच त्यासाठी या पर्यायांचेही काही नियम असतील ते तर तुम्हाला फॉलो करावेच लागती

(डिस्क्लेमर: वरील माहती उपलब्ध स्रोतावरून केली आहे . आम्ही याबाबत कोणताही दाव करत नाही पण सुरक्षेच्या दृष्टीने हे पर्याय उपयोगात आणण्याआधी ते पर्याय पडताळून नक्की पाहा, खात्री करून घ्या)

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.