आपण यांना पाहिलंत का? जगातील गर्भश्रीमंत असामी कशा झाल्या क्षणात गरीब?

Artificial Intelligence : एलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, मुकेश अंबानी यांच्यासारखे श्रीमंत लोक गरीब असते तर ते कसे दिसले असते, कसे जगतील, त्यांनी कपडे कसे घातले असते ?

आपण यांना पाहिलंत का? जगातील गर्भश्रीमंत असामी कशा झाल्या क्षणात गरीब?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 8:20 AM

नवी दिल्ली : वेस्टवर्ल्ड (Westworld)नावाची एक अमेरिकन टीव्ही मालिका आहे, ज्यामध्ये मानवी रूप असलेले रोबोट (robot) दाखवले आहेत. त्याची कहाणी अशी आहे की रोबोटला वाटते की ते खरे मानव आहेत, पण प्रत्यक्षात ते रोबोटच राहतात आणि जेव्हा हे कळते तेव्हा ते देखील आश्चर्यचकित होतात. बरं, ते रीलचं, आभासी जग होतं, पण सध्या तंत्रज्ञान (technology) ज्या पद्धतीने विकसित होत आहे, ते पाहता, असं काही येत्या काळात प्रत्यक्षातही घडू शकतं, यात काहीच शंका नाही. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI)मदतीने काहीही करता येऊ शकते. आजकाल AI चा असाच एक चमत्कार सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून लोकही हैराण झाले आहेत.

खरंतर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने जगातील सर्वात श्रीमंत लोकांना गरीब बनवले (दाखवले) आहे. एलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स आणि मुकेश अंबानी यांच्यासारखे श्रीमंत लोक गरीब असते तर ते कसे दिसय असते, कसे जगतील, कपडे कसे घालतील ? हे काही फोटोजमधून दाखवण्यात आले आहे.

एलॉन मस्क आणि मुकेश अंबानींसह जगातील सर्वात श्रीमंतांचा ‘गरीब अवतार’ पहा

View this post on Instagram

A post shared by Gokul Pillai (@withgokul)

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प एका झोपडपट्टीसमोर कसे उभे आहेत. त्यांचे केस विस्कटलेले आहेत आणि त्यांनी एक साधासा बनियान घातला आहे. त्याचबरोबर एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले बिल गेट्स यांनाही अर्धवच कपडे परिधान केलेल्या अवस्थेत दाखवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर उद्योगपती असलेले, अब्जाधीश मुकेश अंबानी यांनाही झोपडपट्टीत राहून साधे कपडे घातलेले दाखवण्यात आले आहे. याशिवाय वॉरन बफे आणि मार्क झुकरबर्ग यांनाही याच शैलीत दाखवण्यात आले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची ही आगळीवेगळी आणि जरा धक्कादायकच अशी छायाचित्रे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर withgokul नावाच्या आयडीद्वारे शेअर करण्यात आली आहेत. या फोटोजना आत्तापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत आणि शेकडो लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने गंमतीत लिहिले आहे की, ‘एलन मजदूर’, तर दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, ‘वॉरेन बफे इथेही श्रीमंत दिसत आहेत’. अशा विविध मजेशीर कॉमेंट्सही अनेकांनी लिहील्या आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.