VIDEO | जेव्हा सुनेत्रा अजित पवार गातात… लाख मना ले दुनिया… साथ न ये छुटेगा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बहीण नीता पाटील यांच्या 60 व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पवार कुटुंबाने केलं

VIDEO | जेव्हा सुनेत्रा अजित पवार गातात... लाख मना ले दुनिया... साथ न ये छुटेगा
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 12:27 PM

बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबात सण समारंभ असो किंवा कोणाचे वाढदिवस, त्याचं सेलिब्रेशन जंगी असतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगिनी नीता पाटील यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशनही पवार कुटुंबाने एकत्रित केलं. यावेळी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’ हे गाणं गाऊन समां बांधला. (Ajit Pawar wife Sunetra Pawar sings Tere Mere Sapne)

अजित पवार यांची बहीण नीता पाटील यांच्या 60 व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन काल (मंगळवारी) करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार, शर्मिला पवार यांच्यासह कुटुंबातील सदस्यांकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नीता पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

जुन्या काळातील वेगवेगळी प्रसिद्ध गाणी पवार कुटुंबातील सदस्यांनी गायली. किशोर कुमारांचं “फूलों की रंग से… लेना होगा जनम हमे कई कई बार”, मोहम्मद रफींचं “तेरे मेरे सपने अब एक रंग है अशी अनेक गाणी यावेळी सादर झाली. सुप्रिया सुळेंनी आग्रह धरल्याने वहिनी सुनेत्रा पवार यांनी ‘लाख मना ले दुनिया…साथ न ये छुटेगा, आके मेरे हाथों मे हाथ न ये छुटेगा.. ओ मेरे जीवनसाथी… तेरे मेरे सपने अब एक रंग है’ असं गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं.

पवार कुटुंबाचं बिग सेलिब्रेशन

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आता रोहित पवार… राजकारणात जसं पवारांचं मोठं नाव आहे अगदी त्याच पद्धतीने त्यांचं कुटुंब देखील मोठं आहे. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र येतं. असाच एक फोटो राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केला होता.

शरद पवार यांच्या वाढदिवसाला सगळं कुटुंब एकत्र जमा झालं होतं. कुटुंबप्रमुखाचा वाढदिवस असल्याने सगळे जण आनंदी होते. शुभेच्छांचा फॉर्मल कार्यक्रम पार पडल्यानंतर फोटोसेशन झालं. या फोटोत 70 हून अधिक जण होते. (Ajit Pawar wife Sunetra Pawar sings Tere Mere Sapne)

संबंधित बातम्या

दोन बर्थडे आणि एक अ‌ॅनिव्हर्सरी, पवार-ठाकरे कुटुंबाचं ‘तिहेरी सेलिब्रेशन’

मोठे नेते, मोठे कुटुंब, सुप्रिया सुळेंनी ट्विट केलेला फोटो पाहिला का?

पवार कुटुंबियांचं पाडवा सेलिब्रेशन, सोशल मीडियावर फोटो शेअर

(Ajit Pawar wife Sunetra Pawar sings Tere Mere Sapne)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.