Dedication towards job : सोशल मीडियावर (Social media) विविध प्रकारचे व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत असतात. सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरू आहे. यादरम्यानचे व्हिडिओही आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही व्हिडिओ वास्तविक असतात तर काही केवळ दिशाभूल करण्यासाठी शेअर किंवा अपलोड केले जातात. जसे रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. तसाच संघर्ष इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातही सुरू आहे. यादरम्यानचे अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी तो एका वेगळ्या उद्देशाने व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणारे उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. एका भल्या मोठ्या स्फोटाचा हा व्हिडिओ आहे.
हर्ष गोयंकांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे, की गाझा पट्टीतील अल-शारोक टॉवरवर इस्रायली लढाऊ विमानांनी बॉम्बफेक केला. हा धक्कादायक प्रकार व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला आहे. यावेळी या इमारतीच्या समोर एक छायाचित्रकार दिसत आहे. अशा धक्कादायक आणि जीवघेण्या प्रसंगातही न डगमगता तो आपले काम करत आहे. याचेच कौतुक गोयंका यांनी केले आहे. आपल्या कामाप्रती आपण किती समर्पणाची भावना ठेवतो, हे शिकवणारा असा हा व्हिडिओ असल्याचे ते म्हणाले आहेत.
This video captured the moment the Al-Sharouk Tower in the Gaza Strip was bombed by Israeli fighter jets.
A lesson on dedication towards your job #photographer pic.twitter.com/rxOnZ2fbO9— Harsh Goenka (@hvgoenka) March 28, 2022
हा व्हिडिओ मागील वर्षाचा असावा. गाझा शहराच्या पश्चिमेकडील अल-रिमल भागात 16 मजली अल-शारोक टॉवरवर हवाई हल्ला झाला. सोशल मीडियावरील स्थानिकांनी येऊ घातलेल्या स्ट्राइकचा इशारा देताना सांगितले, की इस्त्रायली सैन्याने इमारत नष्ट होण्याच्या किमान एक तास आधी छप्पर फाडणारा बॉम्ब टाकला होता. गाझामधील इमारत, ज्यामध्ये स्थानिक आणि परदेशी मीडिया आउटलेट तसेच दुकाने आणि अपार्टमेंट होती. याआधी 2014मध्ये इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यादरम्यान क्षेपणास्त्र हल्ल्याचाही फटका बसला होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर काळ्या धुराचे लोट निघत असल्याचे दिसत आहे.