Pushpa सिनेमातली गाणी झाली, रील्स झाले, डायलॉग्सही झाले; आता हे काय नवीनच? पाहा ‘हा’ Viral Video

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या 'पुष्पा: द राइज' (Pushpa the rise) या सिनेमाला चांगले यश मिळाले. आता एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये चित्रपटाच्या पोस्टरसह छापलेल्या साड्या गुजरातमधील सुरतमध्ये दाखवल्या आहेत.

Pushpa सिनेमातली गाणी झाली, रील्स झाले, डायलॉग्सही झाले; आता हे काय नवीनच? पाहा 'हा' Viral Video
गुजरातमधल्या सुरतमध्ये पुष्पा सिनेमाच्या थीमवर बनवलेली साडी
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 2:14 PM

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa the rise) या चित्रपटाला देशभरात अभूतपूर्व यश मिळाले, हे वेगळे सांगायला नको. दमदार संवाद असो किंवा हृदयाला स्पर्श करणारी गाणी असो, चित्रपट सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाची क्रेझ, चित्रपटाचा ज्वर इतक्यात संपेल असे वाटत नाही. केवळ सेलिब्रिटीच नाही तर सामान्य लोकांनीही श्रीवल्ली आणि सामी-सामीच्या गाण्यांवर इन्स्टाग्राम रील्स व्हिडिओ बनवले आहेत. ‘पुष्पा’ची भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनची हुबेहूब कॉपी करणारेही अनेक जण होते. गाण्यांपासून ते संवादांपर्यंत सर्वच बाबतीत हा चित्रपट हिट ठरला. आता अनेक फॅशन डिझायनर्सही चित्रपटाच्या पोस्टर्ससोबत साड्या छापून चित्रपटाची लोकप्रियता कॅश करण्याचा प्रयत्न करत आहेत.

चर्चेचा विषय

एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चित्रपटाच्या पोस्टरसह छापलेल्या साड्या गुजरातमधील सुरतमध्ये दाखवल्या आहेत. चरणजीत क्रिएशन्स या स्थानिक दुकानाने बनवलेली अनोखी साडी शहरात चर्चेचा विषय बनली आहे. पुष्पा पोस्टर वापरून साडी बनवण्याची कल्पना मालक चरणपाल सिंग यांनी मांडली होती, ज्यांनी सोशल मीडियावर छापील साड्यांचे अनेक नमुने शेअर केले होते जे व्हायरल झाले होते. काही वेळातच, अनेक ग्राहकांनी दुकानात गर्दी केली आणि मालकाला देशभरातील कापड व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आली.

ट्विटरवर शेअर

राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडसह प्रमुख राज्यांतील लोक तिला ‘पुष्पा’ साडी म्हणत ऑर्डर करत आहेत. जोपर्यंत या चित्रपटाचा ट्रेंड चालू आहे तोपर्यंत काहीतरी नवीन आणि विचित्र पाहायला मिळत राहील, यात शंकाच नाही. जेव्हा महिलांनी ही साडी पाहिली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला, त्यामुळेच आता या साडीला महिलांमध्ये मोठी मागणी आहे. ट्विटरवर टोटली अल्लू अर्जुन (TeamTAFC) या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर झाला आहे.

आणखी वाचा :

जेव्हा Ajay Devgnला राग येतो..! Video Share करत Anand Mahindra म्हणाले, बहुतेक शहर सोडून जावं लागेल..!

Boyfriend on Rent video : आमच्याकडेही पाहा! हातात पोस्टर घेऊन या विद्यार्थ्याला नेमकं म्हणायचंय तरी काय?

Viral Video : ‘या’ आजीचं इंग्रजीचं कौशल्य पाहा, खास शैलीचं यूझर्स करतायत कौतुक

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.