Amazing apartment for birds : वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या शहरांमध्ये अपार्टमेंट आणि उंच इमारतींचा जणू पूरच आला आहे. लाखो लोक अपार्टमेंटमध्ये स्थायिक होऊ लागले आहेत आणि दोन किंवा तीन बीएचके फ्लॅटमध्ये राहत आहेत. पण कधी पक्ष्यांचा विचार तुम्ही केला आहे का? आपण आपल्या आजूबाजूला इमारतींच्या वर कुठेतरी किंवा झाडांवर ते आपले घरटे बांधतात. पण आता पक्ष्यांसाठीही इमारती बांधल्या जात आहेत. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. होय, असेच काहीसे राजस्थानच्या (Rajasthan) बिकानेर (Bikaner) जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. पक्ष्यांसाठी (Birds) असे अपार्टमेंट बनवण्यात आले आहे, ज्यामध्ये ते फक्त येऊन राहू शकत नाहीत, तर आतल्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळही करू शकतात. पक्ष्यांचा किलबिलाट आता इथे पाहायला मिळत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात असा अनोखा अपार्टमेंट बनवण्यात आले आहे. हे पक्ष्यांचे अपार्टमेंट 11 मजल्यांचे आहे. त्यात प्रत्येक सुखसोयींची काळजी घेण्यात आली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे त्यात पक्ष्यांना आंघोळ करण्यासाठी स्विमिंग पूलही तयार करण्यात आला आहे. या अपार्टमेंटमध्ये सुमारे 1100 पक्षी राहू शकतात. राजस्थानमधील बिकानेरमधील श्रीडुंगरगडच्या टोलियासर गावात हे विशेष अपार्टमेंट तयार करण्यात आले आहे.
बीकानेर, राजस्थान में पक्षियों के लिये यह 11 मंजिल का टावर बनवाया गया है, जिसमें लगभग 1100 पक्षी रह सकते हैं. अद्भुत.❤️ pic.twitter.com/BJKezW7Krp
— Awanish Sharan (@AwanishSharan) March 28, 2022
आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला 18 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. हे अपार्टमेंट आहेच असे. या अपार्टमेंटमध्ये पक्षी येऊन त्यांची घरटी तयार करू शकतात. यासोबतच त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ते तयार करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च आला. हे अपार्टमेंट घुमटाच्या आकारात बनवण्यात आले आहे, जेणेकरून पक्षी कोणत्याही बाजूने येऊन त्यामध्ये वस्ती करू शकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक पक्षी आतापासूनच येऊन राहू लागले आहेत. त्यांना राहण्यासाठी मातीची घरेही बांधण्यात आली आहेत.