Creative wood craft : प्रत्येकाकडे त्याचं सर्वोत्तम असतं, जे तो वेळ आल्यावर देतो..! Video viral
Wood craft : या जगात कलाकार (Artist) आणि कुशल लोकांची काही कमी नाही. एखाद्याकडे असे अद्भुत कौशल्य (Skill) असते, की पाहणारे थक्क होतात. एक व्हिडिओ जो व्हायरल होत आहे, यातली क्रिएटिव्हिटी (Creativity) पाहून थक्क व्हाल.
Wood craft : या जगात कलाकार (Artist) आणि कुशल लोकांची काही कमी नाही. एखाद्याकडे असे अद्भुत कौशल्य (Skill) असते, की पाहणारे थक्क होतात. काही लोक आपल्या गायन कौशल्याने आश्चर्यचकित करतात तर काही त्यांच्या नृत्य कौशल्याने. त्याच बरोबर काही लोक असेही आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारे कला दाकवून आपल्या सर्जनशीलतेचा असा नमुना दाखवतात, की लोकांच्या तोंडून ‘व्वा’ शिवाय काहीच निघत नाही. तुम्ही सोशल मीडियावर क्रिएटिव्हिटीशी संबंधित अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील, परंतु यासंबंधित एक व्हिडिओ जो व्हायरल होत आहे, तो सर्वात वेगळा, सर्वात अनोखा आणि सर्वोत्तम आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली क्रिएटिव्हिटी (Creativity) पाहून थक्क व्हाल आणि असा विचार करायला भाग पडाल, की एवढी अप्रतिम क्रिएटिव्हिटी कोणाकडे तरी कशी असू शकते!
आश्चर्यकारक सर्जनशीलता
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती लाकूड कापून त्यात कलाकृती बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तो प्रथम लाकडाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कापतो आणि त्यात एक सुंदर आकार बनवतो. नंतर तो आकृतीला पॉलिश करतो आणि नंतर छोट्या साधनांचा वापर करून एवढी सुंदर कलाकृती तयार करतो, की पाहणारे पाहतच राहतात. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर त्याने इतके बारकाईने काम केले आहे, की ही कलाकृती कोणत्या लाकडाची आहे हे पाहणाऱ्यांना सांगता येणार नाही. अशी आश्चर्यकारक सर्जनशीलता असलेली माणसे जगात क्वचितच आढळतात, त्यांच्या कलाकृती पाहून लोक आश्चर्यचकित होतात.
In the mind of every #artist, There is a #masterpiece! pic.twitter.com/1OM8XBvypv
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 6, 2022
ट्विटर हँडलवर शेअर
हा अप्रतिम व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक अद्भुत गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले, ‘प्रत्येक कलाकाराच्या मनात एक कलाकृती असते!’ हे अगदी खरे आहे. प्रत्येकाकडे नक्कीच त्याचे सर्वोत्तम असते, जे तो वेळ आल्यावर देतो.
‘नैसर्गिक कौशल्य’
अवघ्या 49 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 8 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरने याला नैसर्गिक कौशल्य म्हणून वर्णन केले आहे, तर दुसऱ्याने ही एक अद्भुत कला असल्याचे लिहिले आहे.