जेफ बेझॉससोबत घटस्फोटानंतर 38,66,37,65,00,000 ची मालकीण, मॅकेंझी स्कॉटचे आता शिक्षकाशी लग्न

50 वर्षीय मॅकेंझी स्कॉट यांनी डॅन जुएट (Dan Jewett) यांच्याशी लग्न केलं. डॅन हे सिएटलमधील एका खासगी शाळेत विज्ञान शिक्षक आहेत. (Jeff Bezos' ex-wife MacKenzie Scott )

जेफ बेझॉससोबत घटस्फोटानंतर 38,66,37,65,00,000 ची मालकीण, मॅकेंझी स्कॉटचे आता शिक्षकाशी लग्न
डावीकडे मॅकेंझी स्कॉट आणि पती डॅन, उजवीकडे मॅकेझीं घटस्फोटित पती जेफ बेझॉससह (संग्रहित फोटो)
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 12:10 PM

न्यूयॉर्क : कोणे एके काळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेल्या अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस (Jeff Bezos) यांची घटस्फोटित पत्नी मॅकेंझी स्कॉट (MacKenzie Scott) पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्या आहेत. मॅकेंझी यांनी आपल्या मुलांच्या शाळेतील शिक्षकासोबतच लगीनगाठ बांधली. घटस्फोटाच्या दीड वर्षांनंतर मॅकेंझी यांचा नवा संसार सुरु होत आहे. (Amazon founder Jeff Bezos’ ex-wife MacKenzie Scott marries teacher)

53 बिलियन डॉलरची मालकी

25 वर्षांच्या संसारानंतर जुलै 2019 मध्ये मॅकेंझी स्कॉट आणि अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांचा घटस्फोट झाला होता. मॅकेंझी या 53 बिलियन डॉलर (अंदाजे 38,66,37,65,00,000 किंवा 3 लाख 86 हजार 637 कोटी रुपये) इतकी त्यांची संपत्ती आहे. मॅकेंझी स्कॉट या लेखिका आणि समाजसेविका आहेत.

मुलांच्या शाळेतील शिक्षकाशी लग्न

50 वर्षीय मॅकेंझी स्कॉट यांनी डॅन जुएट (Dan Jewett) यांच्याशी लग्न केलं. डॅन हे सिएटलमधील एका खासगी शाळेत विज्ञान शिक्षक आहेत. मॅकेंझी स्कॉट आणि जेफ बेझॉस यांची मुलं त्याच शाळेत शिकतात. मॅकेंझी स्कॉट यांनी लग्न नेमकं कधी केलं, डॅनसोबत त्या कधीपासून रिलेशनशीपमध्ये होत्या, हे अद्याप अस्पष्ट आहे.

जेफ बेझॉसकडूनही शुभेच्छा

मॅकेंझी सिएटलमध्ये पती डॅन आणि चार मुलांसोबत राहतात. ही चारही मुलं मॅकेंझी स्कॉट आणि जेफ बेझॉस यांची आहेत. विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांनीही दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. डॅन हा उत्तम व्यक्ती आहे. डॅन आणि मॅकेंझी यांना एकत्र पाहताना मला अतीव आनंद होत आहे, अशा भावना बेझॉसनी व्यक्त केल्या. (Amazon founder Jeff Bezos’ ex-wife MacKenzie Scott marries teacher)

बेझॉसच्या पत्नीचा 31,000 कोटींचा दानयज्ञ

कोणे एके काळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेल्या अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांचा जुलै 2019 मध्ये मॅकेंझी स्कॉट यांच्याशी घटस्फोट झाला. यासाठी दोघांमध्ये 3800 कोटी डॉलर म्हणजेच 2.60 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा करार झाला. कंपनीची चार टक्के भागिदारीही त्यांना मिळाली. घटस्फोटानंतर त्या अचानक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 22 व्या क्रमांकावर आल्या होत्या.

जेफ बेझॉस यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर मॅकेंझी स्कॉट त्यांचं नशीब पालटलं. कोरोना काळात अ‍ॅमेझॉनला व्यवसायात झालेल्या नफ्याचा लाभही त्यांना झाला. मात्र त्यानंतर स्कॉट यांनी दानधर्माची योजना आखली.

संबंधित बातम्या :

जगातील सर्वात महागड्या घटस्फोटानंतर बेझॉसच्या पत्नीचा 31,000 कोटींचा दानयज्ञ

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत Jeff Bezos यांची गर्लफ्रेण्डच्या भावाकडे 12 कोटींची मागणी

(Amazon founder Jeff Bezos’ ex-wife MacKenzie Scott marries teacher)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.