ऑफिसमध्ये जायचा कंटाळा येतोय? ही बातमी वाचा… नामांकित कंपनी देतेय आयुष्यभरासाठी वर्क फ्रॉम होम!
आता आयुष्यभर वर्क फ्रॉम होम करण्याची संधी निर्माण झाली आहे. आता कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम करता येणार आहे. एका कंपनीने तसा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई : कोरोनामुळे (Corona) सगळ्या गोष्टी बदलल्या… लोकांचं राहणीमान, आरोग्याची पथ्ये, कामाची पद्धत आणि बरंच काही… कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा (Work From Home) पर्याय निवडला आहे. कामाची ही पद्धत अनेकांना आवडली. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने अनेक कंपन्यांनी ऑफिसमधून काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण अनेकांना ऑफिसमध्ये जाण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करण्यावर त्यांचा भर असतो. पण आता आयुष्यभर वर्क फ्रॉम होम करण्याची संधी निर्माण झाली आहे. आता कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम करता येणार आहे. एका कंपनीने तसा निर्णय घेतला आहे.
कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम!
आता आयुष्यभर वर्क फ्रॉम होम करण्याची संधी निर्माण झाली आहे. आता कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम करता येणार आहे. एका कंपनीने तसा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांना आयुष्यभर घरून काम करण्याची संधी दिली आहे. आता या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कधीही ऑफिसमध्ये यावं लागणार नाही. सगळी कामं घरूनच करता येणार आहेत. यामुळे कंपनीचा तसेच कर्मचाऱ्यांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पाहिजे तोपर्यंत घरून काम करण्याची ऑफर दिली आहे.
अमेरिकेची Airbnb Inc या कंपनीने हा निर्णय घेतला आहे. Airbnb Inc ही कंपनी जगभर पसरललेली आहे. ही कंपनी जगातील 170 देशांमध्ये काम करते. ही कंपनी भारतातही आपला व्यवसाय करते. यासाठी पगार कापला जाणार नाही. या कंपनीत 6 हजारांहून अधिक लोक काम करतात. यातील 3 हजार कर्मचारी अमेरिकेतील आहेत तर उर्वरित कर्मचारी जगातील इतर देशांमधले आहेत.
या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की ते आयुष्यभर घरून काम करू शकतात. विशेष म्हणजे जरी घरून काम करत असले तरी या कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक ब्रायन चेस्की यांनी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना हा अधिकृत मेल पाठवला आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहूनही आपण आपले काम करू शकतो.